ETV Bharat / state

सांगलीत काँग्रेसला खिंडार? जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर.. - जयश्रीताई पाटील करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली महापालिका क्षेत्रातल्या काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिका क्षेत्रातल्या कॉंग्रेसला बळ देण्याचे काम जयश्रीताई पाटील यांनी केलं आहे. काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने जयश्रीताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

sangli Congress leader Jayashree Patil
काँग्रेस नेत्या जयश्री पाटील
author img

By

Published : Jul 14, 2020, 10:00 PM IST

सांगली - माजी मंत्री व दिवंगत नेते मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी व सांगलीच्या काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने जयश्रीताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या चर्चेअंती पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल, असे स्पष्ट करत मंगळवारी दिवसभर जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

सांगली महापालिका क्षेत्रातल्या काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिका क्षेत्रातल्या कॉंग्रेसला बळ देण्याचे काम जयश्रीताई पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या पश्चात काँग्रेस जिवंत ठेवण्यापासून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रात काँग्रेस नगरसेवकांचा एक मोठा गट कार्यरत आहे.

मात्र काही वर्षांपासून जयश्रीताई पाटील असो किंवा त्यांच्या गटातले कार्यकर्ते, नेते या सर्वांना पक्षाच्या गटबाजीचा मोठा फटका बसला आहे. त्याच बरोबर कॉंग्रेसमधून वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांनी न्याय देण्याची भूमिका ही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मदन भाऊ पाटील गटामध्ये गेल्या काही महिन्यांपासून खदखद सुरू होती. यातून नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये हे प्रवेश करण्याचा दबाव वाढवला होता, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्याचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याबरोबर जयश्रीताई पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा सुद्धा झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांच्या प्रवेशाबाबत चर्चा केल्याचं जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लवकरच जयश्रीताई पाटील यांचा प्रवेश होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून देण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी प्रवेश बाबत कार्यकर्ते आग्रही...

दुसऱ्या बाजूला जयश्रीताई पाटील यांनी मात्र अद्याप पक्ष प्रवेशाची भूमिका स्पष्ट केली नाही,कार्यकर्त्यांचा मागणी आहे, त्यामुळे आधी मदनभाऊ पाटील समर्थक, कार्यकर्ते, नेते यांच्या बरोबर चर्चा केली जाईल आणि कार्यकर्त्यांचा जो निर्णय असेल त्यानुसार आपली भूमिका असेल, असे मत जयश्रीताई पाटील यांनी स्पष्ट केले आहे.तर मंगळवारी दिवसभर आणि रात्री उशिरा पर्यंत जयश्रीताई पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा सुरू होती,ज्यामध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवत ,राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा आग्रह धरला आहे.यामध्ये पालिके क्षेत्रातील जयश्रीताई पाटील समर्थक काँग्रेस नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा आग्रह धरल्याचे सांगण्यात आले आहे.त्यामुळे जयश्रीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील,अशी चर्चा कार्यकर्त्यामध्ये होती.

काँग्रेस नेत्यांची जयश्रीताईंची मनधरणी..

मंगळवारी दिवसभरात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांच्याशी संपर्क साधून मनधरणी करत काँग्रेस सोडू नये अशी विनंती केली आहे.यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क करत पक्ष सोडू नका अशी विनंती केली आहे.

चार दिवसात घेणार निर्णय ?

एका बाजूला काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचा काँग्रेस न सोडण्याचा दबाव तर दुसऱ्या बाजूला समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा आग्रह,या सर्व पार्श्‍वभूमीवर येत्या चार दिवसांमध्ये आता जयश्रीताई पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचा मदन पाटील समर्थक गोटातून सांगण्यात आले आहे...
त्यामुळे जयश्रीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार की ? काँग्रेस मध्ये राहणार ? हे स्पष्ट होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.