ETV Bharat / state

...म्हणून मंत्री जयंत पाटलांसह विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी - विश्वजित कदम गुन्हा

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सांगली भाजपकडून करण्यात आली आहे.

minister jayant patil and vishwajit kadam
मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम
author img

By

Published : Jan 28, 2020, 2:59 AM IST

Updated : Jan 28, 2020, 3:31 AM IST

सांगली - जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सांगली भाजपकडून करण्यात आली आहे. सांगलीत काढण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चा दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी भाजपने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रारवजा निवेदन दिले आहे.

मंत्री जयंत पाटलांसह विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

सांगलीत 25 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या #NRC व #CAA कायद्याविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेत मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर देशाची फाळणी करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत संसदेत मंजूर करून कायद्यात रूपांतर झालेल्या कायद्याविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप सांगली भाजपकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा - कोल्हापूरच्या गिर्यारोहकानं, 'किलिमंजारो' शिखरावर फडकवला ७१ फुटी तिरंगा

राज्य सरकारचे प्रतिनिधी असताना चिथावणी देणे हा गुन्हा असल्याने मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यावर आयपीसी 505 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीवजा तक्रार भाजप प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर आणि शेखर इनामदार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली.

दरम्यान, भाजपने दिलेले निवेदन प्राप्त झाले असून वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगली पोलिसांनी सांगितले आहे.

Intro:File name - mh_sng_03_bjp_on_minister_fir_dimand_vis_01_7203751 -

स्लग : मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा - भाजपानी केली मागणी.

अँकर - जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी सांगली भाजपाकडून करण्यात आली आहे.सांगलीत काढण्यात आलेल्या एनआरसी व सीएए कायद्या विरोधात निघालेल्या मोर्चा दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी भाजपाने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रारवजा निवेदन दिले आहे.Body:सांगलीत दिनांक 25 रोजी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या NRC व CAA कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्च्या मध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम सहभागी झाले होते.आणि या वेळी आयोजित सभेत मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी बोलताना पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर देशाची फाळणी करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत संसदेत मंजूर करून कायद्यात रूपांतर झालेल्या कायदा विरोधात चिथावणी खोर भाषण केल्याचा आरोप सांगली भाजपाकडून करण्यात आला आहे.राज्य सरकारचे प्रतिनिधी असताना चिथावणी देणे हा गुन्हा असल्याने त्यांच्यावर मंत्री जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांच्यावर आयपीसी 505 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीवजा तक्रार भाजप प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर आणि शेखर इनामदार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली.

बाईट: नीता केळकर, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा

दरम्यान,भाजपाने दिलेले निवेदन प्राप्त झाले असून वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल,अस सांगली पोलिसांनी सांगितले आहे.

बाईट: अजय शिंधकर - पोलीस निरीक्षक,सांगली शहरConclusion:
Last Updated : Jan 28, 2020, 3:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.