सांगली - जिल्ह्यातील 29 व कोल्हापूर जिल्ह्यातील 29 धरणग्रस्त वसाहतीमध्ये शासनाच्या विरोधात नागरिकांनी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यत आंदोलन केले. वारणा धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त संग्राम समितीचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
पुनर्वसन अधिकारी यांची बदली व्हावी. धरणग्रस्ताना योग्य वागणूक मिळत नाही. प्रांताधिकारी 2 महिन्याला तर जिल्ह्यापुनर्वसन अधिकारी 4 महिन्याला आढावा बैठक घेत होते, आता त्यासुद्धा बंद केल्या. त्या वेळेवर व्हावे, धरणग्रस्तांना अपमानाची वागणूक दिली जाते. शासनाचे धरणग्रस्ताकडे दुर्लक्ष करत आहेत.
या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी गौरव नायकवडी यांनी सांगितले, की आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालया पुढे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी धरणग्रस्तांची भेट देऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. या वेळी ते म्हणाले ज्यांची घरे, दारे ,जमिनी विकासाच्या नावाखाली काढून घेतली, त्या चांदोली धरणग्रस्त जनतेला न्याय मिळण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.