ETV Bharat / state

सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का  बसला आहे. शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत महाजनादेश यात्रेमध्ये सत्यजित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
author img

By

Published : Sep 15, 2019, 11:52 PM IST

सांगली - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिराळा काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत महाजनादेश यात्रेमध्ये सत्यजित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिराळ्यात पार पडलेल्या जनसंवाद मेळाव्यात हा त्यांनी हा निर्णय घेतला.

सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

हेही वाचा - होर्डिंग लावून तिकीट मिळत नाही, काम पाहूनच तिकीट देणार - मुख्यमंत्री

शिराळा काँग्रेसचे नेते व माजी विधान परिषद सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देत, सत्यजित देशमुख यांनी भाजपाची वाट धरली. काही महिन्यांपासून सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होते. चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले. देशमुख यांनी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा घेऊन काँग्रेस पक्ष सोडत असल्याची भूमिका जाहीर केली. या मेळाव्यात भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा - 'छत्रपती' ही उपाधी महत्वाची; त्या मागचा व्यक्ती नाही, रोहित पवारांचा उदयनराजेंना टोला

यावेळी सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आगपाखड करत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभा राहिलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष! शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबावर अन्याय केला. सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले, अशी टीका सत्यजित देशमुख यांनी केली. सोमवारी सांगलीत दाखल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसशी आतापर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख घरान्याने भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

Intro:
File name - mh_sng_02_deshmukh_on_bjp_vis_01_7203751 - to - mh_sng_02_deshmukh_on_bjp_vis_02_7203751

स्लग - सांगलीत काँग्रेसला धक्का, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सत्यजित देशमुखांनी धरली भाजपाची वाट,
...

अँकर - सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसला मोठा धक्का विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसला आहे.शिराळयाचे काँग्रेस नेते सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगलीत महाजनादेश यात्रेमध्ये सत्यजित देशमुख आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, शिराळयात पार पडलेल्या जनसंवाद मिळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
Body:सांगली जिल्ह्यातल्या कॉंग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे.शिराळयाचे काँग्रेस नेते व माजी विधान परिषद सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे,काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा देत,सत्यजित देशमुख यांनी भाजपाची वाट धरली आहे. काही महिन्यांपासून सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होते, आणि या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे.देशमुख यांनी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा घेऊन कॉंग्रेस पक्ष सोडत असल्याची भूमिका जाहीर करत,भाजपा प्रवेशाची निर्णय घेतला आहे.या मेळाव्यासाठी भाजपाचे खासदार संजयकाका पाटील,आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आगपाखड करत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. स्वार्थावर उभा राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षची शकलं उडायली लागली आहेत,शरद पवार यांनी शिवाजीराव देशमुख साहेबावर अन्याय केला,सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले,अशा शब्दात राष्ट्रवादी आणि शरद पवार याच्यावर आगपाखड करत सत्यजित देशमुख यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली.आणि उद्या सांगलीत दाखल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये सत्यजित देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.तर
काँग्रेसशी आतापर्यत एकनिष्ठ राहिलेल्या देशमुख घरान्याने भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून यातून, काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसरले आहे.

बाईट- सत्यजित देशमुख

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.