सांगली - जिल्ह्यात आलेल्या महापुराने सांगलीकरांचे खूप हाल होत आहेत. कृष्णा नदीला आलेला पूर ओसरावा यासाठी सांगलीतील महिलांनी नदीची ओटी भरली आहे. यावेळी कृष्णामाई कोपू नये, अशी विनवणी या महिलांनी केली आहे.
सहाव्या दिवशीही सांगली आणि कोल्हापुरात पुराचा कहर सुरुच आहे. लष्कर आणि नौदलाच्या पथकांमार्फत पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. ग्रामिण भागात जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र, पावसाची संततधार सुरुच आहे, त्यामुळे लोकांना संकटांचा सामना करावा लागतो आहे. वीज नाही, घरात पाणी, रस्ते कोलमडलेले, पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती कायम आहे. अशा स्थितीत कृष्णेचा पूर ओसरावा, लोकांचा दिनक्रम पून्हा व्यवस्थित सुरू व्हावा यासाठी या महिलांनी नदीची पूजा केली आहे. कृष्णामाई कोपू नको, असे नदीला साकडे घातले.