ETV Bharat / state

टाकाऊतून स्वछतेचा संदेश..! भंगारातील साहित्यापासून सांगलीत साकारले अनोखे 'उद्यान'

सांगलीत एक पर्यावरण पूरक आणि स्वच्छतेचा संदेश देणार उद्यान साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे भंगारात जाणाऱ्या आणि महापालिकेच्या कचऱ्याच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू पासून "वेस्ट टू बेस्ट" अशा पद्धतीचे हे उद्यान निर्माण करण्यात आले आहे, त्यामुळे याला "बेस्ट फ्रॉम वेस्ट" असे नाव देण्यात आलेले आहे.

sangali news
"टाकाऊतून स्वछतेचा संदेश
author img

By

Published : Mar 12, 2021, 9:01 AM IST

Updated : Mar 12, 2021, 9:37 AM IST

सांगली - शहराच्या वैभवात भर घालणारे एक अनोखे उद्यान सांगली महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तुंपासून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. "बेस्ट फ्रॉम वेस्ट" हे उद्यान आमराईमध्ये निर्माण करण्यात आले असून हे उद्यान आता नागरिकांना भुरळ घालण्या बरोबरच टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करण्याचा आणि स्वच्छ सांगलीचा संदेश देत आहे.

sangali
टाकावू वस्तूंपासून साकारलेले उद्यान

भंगारातील साहित्यातून साकारले उद्यान-

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सांगली शहर बनवण्यासाठी अनेक पातळ्यांवर सांगली महापालिकेच्यावतीने वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आणि निर्धार फाउंडेशनच्या माध्यमातून आमराई याठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून हे आकर्षक उद्यान साकारण्यात आले. भंगारात जाणाऱ्या आणि महापालिकेच्या कचऱ्याच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू पासून "वेस्ट टू बेस्ट" अशा पद्धतीचे हे उद्यान निर्माण करण्यात आले आहे, त्यामुळे याला "बेस्ट फ्रॉम वेस्ट" असे नाव देण्यात आलेले आहे.

टाकाऊतून स्वछतेचा संदेश..

कल्पकतेने साकारले अनोखे उद्यान-

या उद्यानात जुन्या प्लास्टिकच्या वस्तू, टायर, बॉटल, लाकडी वस्तू, लोखंडी वस्तूंचा पुनर्वापर करून वेगवेगळ्या प्रकारची लहान मुलांसाठी खेळणी आणि साहित्य बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृतीही साकारण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये जुना टांगा, घोडे, बैलगाडी, तोफ, पाण्याची टाकी, अशा आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच या उद्यानाला टायरांचे कुंपण घालण्यात आले आहे. तसेच उद्यानात बसण्यासाठी झाडांचे ओंडके, टायर, त्याचबरोबर जुने पत्र्याचे ब्यारेल यांच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीची आसन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे.

sangali news
भंगारातील साहित्यापासून सांगलीत साकारले अनोखे 'उद्यान'

टाकाऊतून स्वछतेचा संदेश -

याशिवाय या उद्यानात प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांपासून आकर्षक अशा पद्धतीची सजावट आणि त्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या-छोट्या झाडांचे रोपण, त्याच बरोबर याठिकाणी असणाऱ्या झाडांवर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. या ठिकाणी जे काही आकर्षक आणि वेगवेगळ्या पद्धतीचे निर्माण करण्यात आले, ते सर्व टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेले आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी रंगरंगोटीही करण्यात आली असून या उद्यानाच्या परिसरामध्ये स्वच्छतेचे संदेश देणारे फलकही आकर्षक स्वरूपात लावण्यात आलेले आहेत.

पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न..

याबाबत महापालिका आयुक्त नितिन कापडणीस म्हणाले, 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान', 'माझी वसुंधरा' या अभियानाच्या माध्यमातून एक पर्यावरणपूरक अभियान सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत राबवण्यात येत आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आमराई याठिकाणी एक उद्यान विकसित करण्याचा संकल्प केला होता. यासाठी निर्धार फाउंडेशन असेल किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटची विद्यार्थी असे, या सर्वांनी मिळून या ठिकाणी जुन्या भंगारातील त्याचबरोबर महापालिकेच्या कचऱ्यातून उपलब्ध झालेल्या वस्तूंपासून या उद्यानाची निर्मिती केलेली आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी हे उद्यान एक पर्वणी म्हणून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच थोडा विरंगुळा आणि तोही वेगळ्या पद्धतीने त्याचा अनुभव घेता येईल, या दृष्टीने या उद्यानाची कल्पक पध्दतीने निर्मिती करण्यात आलेली आहे. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून या उद्यानाच्या माध्यमातून स्वच्छ सांगलीचा संदेश आणि आपआपला परिसर पर्यावरण पुरक राखण्याचा एक संदेशही देण्याचा प्रयत्न केला असल्याचंही आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले.

sangli news
टाकावूपासून निर्मित उद्यान

बालगोपाळांसाठी पर्वणी -

हे उद्यान पाहण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. या ठिकाणी येणारी छोटी-छोटी मुलं उद्यानातील वेगवेगळ्या प्रतिकृती पाहून भारावून जातात, याशिवाय पालकांनाही आपल्या पाल्यांना एक वेगळा अनुभव देण्याची पर्वणी या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे सांगलीकर नागरिकांनी या उद्यानाचे उस्फुर्तपणे स्वागत केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेच उद्यान !

टाकाऊ वस्तूंपासून अनेक वस्तूंची निर्मिती होत असते, मात्र या वस्तू पासून एखाद्या उद्यान साकारण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाचा प्रयोग असून महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेले, हे पहिलेच उद्यान असल्याचाही दावा करण्यात येत आहे.

Last Updated : Mar 12, 2021, 9:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.