ETV Bharat / state

Sambhaji Bhide on Wine Salling Decision : लिव्ह-रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना संपवले पाहिजे - भिडे गुरूजी - Sambhaji Bhide Sangli pc

संभाजी भिडे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ( Sambhji Bhide Criticize Thackeray Government ) अत्यंत नीच आणि राष्ट्रविघातक निर्णय असल्याची टीका करत राज्यपालांनी हे सरकार तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी संभाजी भिडे ( Sambhaji Bhide Sangli Press Conference ) यांनी केली आहे.

Sambhaji Bhinde Guruji
संभाजी भिडे
author img

By

Published : Jan 28, 2022, 7:25 PM IST

Updated : Jan 29, 2022, 12:23 AM IST

सांगली - राज्यातील मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या मंत्रिमंडळ निर्णयावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide on Wine Salling Decision ) गुरुजी महविकास आघाडी सरकारवर चांगलेच भडकले आहेत. संभाजी भिडे यांनी सांगलीत पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ( Sambhji Bhide Criticize Thackeray Government ) अत्यंत नीच आणि राष्ट्रविघातक निर्णय असल्याची टीका करत राज्यपालांनी हे सरकार तातडीने बरखास्त करावे, अशी मागणी संभाजी भिडे ( Sambhaji Bhide Sangli Press Conference ) यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे

आर. आर. आबा असते तर...

महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्य उपभोगले. अर्थसत्ता बलवान करण्याचे कारण देत दारू किराणा दुकानातून विक्री करण्याच प्रगतीचे काम केलंय, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी ठाकरे सरकारवर केली. राष्ट्राला राष्ट्र म्हणून टिकण्यासाठी विचाराचे अधिष्ठान असावे लागते. मात्र, दारू खुलेआम विकण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा देशाला हानिकारक, संताप आणणारा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. आबांनी डान्स बार बंद केले. आज ते असते तर दारू विक्रीचा आजचा घातकी निर्णय झाला नसता. आज आर.आर. पाटील यांची आठवण येत आहे, असे भिडे गुरुजी म्हणाले.

हिंदुत्त्ववादी संघटना आणि मराठा क्रांती मोर्चा अशा संघटनांनी दारू विक्री निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उभं राहिलं पाहिजे. तसेच दारूच्या निर्णयाविरोधात आमदारकीचा राजीनामा देऊन आमदारांनी देखील सत्तेतून बाहेर पडायला पाहिजे होते, असे मत भिडे गुरुजींनी व्यक्त केले. खुलेआम दारू विक्रीचा निर्णय मागे घेण्यासाठी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे. मात्र, राज्यात अशा प्रकारचे निर्णय घेणारे सरकार राज्यपालांनी हे बरखास्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात चांगले पंतप्रधान आहेत. लालबहादूर शास्त्रीसारखा मोदींचा कारभार आहे. मोदींनी दारुबंदीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी भिडे गुरुजींनी केले. मुंबईत नाईट लाईफचा निर्णय घेऊ म्हणणे म्हणजे समाज व्याभिचाराच्या दिशेने जाण्यासारखा आहे. तसेच, लिव्ह-रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना याप्रकरी निकाल दिल्याने त्यांनाही संपवले पाहिजे, असे खळबळजनक विधान भिडे गुरुजींनी केले आहे.

...तर त्यानाही संपवले पाहिजे

न्यायाधीशांवर बोलताना आक्षेपार्ह विधान केलंय. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग न्याही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलंय. मी हे बोलल्याने माझ्यावर गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करुदेत, असंही भिडे यांनी म्हटलं. ते राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये देखील वाईनची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही

संभाजी भिडे म्हणाले, “जेव्हा हा निर्णय झाला, तेव्हा कोणत्याही पक्षाचा एकसुद्धा मंत्री, आमदार ‘असा निर्णय करणार असेल तर मी आमदारकीवर, मंत्रीपदावर थुंकतो, तुमच्यात बसण्याचं पाप मी करणार नाही’, असं म्हणून बाहेर पडला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धान्य कुजवून त्याच्यापासून दारू तयार करा असं सांगणारी मंडळी आम्हाला पूज्य असतात. आम्हाला राग येत नाही, संताप येत नाही.”

हेही वाचा - महाआघाडी सरकार आतापर्यंत एकही केस कोर्टात जिंकले नाही, यापुढेही जिंकणार नाहीत - चंद्रकांत पाटील

Last Updated : Jan 29, 2022, 12:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.