ETV Bharat / state

Sambhaji Bhide fell from Bicycle : संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरून पडले; रुग्णालयात दाखल - संभाजी भिडे सायकलवरून पडले

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. सायकलवरून जात असताना चक्कर येऊन भिडे हे खाली (Sambhaji Bhide fell from Bicycle) पडले. त्यामुळे त्यांच्या खुब्याला मार लागला (Sambhaji Bhide injured) आहे. संभाजी भिडे हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

sambhaji bhide
संभाजी भिडे
author img

By

Published : Apr 27, 2022, 7:52 PM IST

Updated : Apr 27, 2022, 8:33 PM IST

सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात झाला आहे. सायकलवरून जात असताना चक्कर येऊन भिडे हे खाली (Sambhaji Bhide fell from Bicycle) पडले. त्यामुळे त्यांच्या खुब्याला मार लागला (Sambhaji Bhide injured) आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

हेही वाचा - Sambhaji Bhides Controversial Statement : इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू - संभाजी भिडेंनी ओकली गरळ

सायकलवरून पडले - बुधवारी (27 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा अपघात झाला आहे. नेहमीप्रमाणे संभाजी भिडे हे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी सायकलवरून गेले होते. दर्शन झाल्यानंतर परतत असताना गणपती मंदिर परिसरात अचानकपणे भिडे यांना चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. हा प्रकार आजूबाजुच्या लोकांना लगेच लक्षात आला. त्यांनी भिडे यांना तत्काळ उचलून बाजूला बसवले. काही वेळात भिडे गुरुजी हे शुद्धीवर आले. मात्र, या घटनेत त्यांच्या खुब्याला मुक्का मार लागला आहे.

घटनेची माहिती मिळताच धारकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर संभाजी भिडे गुरुजी यांना सांगलीच्या भारती रुग्णालयामध्ये पुढील तपासणीसाठी नेण्यात आले आहे.

रोखठोक विधानांमुळे भिडे नेहमीच चर्चेत - संभाजी भिडे हे त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधाने करून वाद ओढावून घेतला आहे. कोरोनाच्या काळात कोरोना रोगच नाही. कोरोनामुळं मृत्यू होणारी माणसे जगण्याच्या लायकीची नाहीत. मास्क लावण्याचा सिद्धांत कोणत्या शहाण्याने काढला, असे धक्कादायक विधान देखील भिडे यांनी केले होते. भिडेंनी आंब्याबाबत केलेले विधानही चर्चेत राहिले होते.

हेही वाचा - Sambhaji Bhide : हिंदुस्थानला गांधी बाधा.. त्यावर उपाय म्हणजे.. सांगलीत संभाजी भिडेंचे वक्तव्य

Last Updated : Apr 27, 2022, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.