ETV Bharat / state

Sambhaji Bhide : हिंदुस्थानला गांधी बाधा.. त्यावर उपाय म्हणजे.. सांगलीत संभाजी भिडेंचे वक्तव्य

author img

By

Published : Apr 27, 2022, 1:36 PM IST

Updated : Apr 27, 2022, 2:27 PM IST

अखंड हिंदुस्थान ( Sambhaji Bhide on Akhand Hindustan ) आणि देशाला ताकद द्यायची असेल, तर हिंदुस्थानच्या 123 कोटी लोकांचा रक्त गट बदलला ( Sambhaji Bhide on Indian people blood group ) पाहिजे आणि तो रक्तगट छत्रपती शिवाजी - संभाजीचे केले पाहिजे, असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे.

Sambhaji Bhide on Akhand Hindustan
अखंड हिंदुस्तान संभाजी भिडे प्रतिक्रिया सांगली

सांगली - अखंड हिंदुस्थान ( Sambhaji Bhide on Akhand Hindustan ) आणि देशाला ताकद द्यायची असेल, तर हिंदुस्थानच्या 123 कोटी लोकांचा रक्त गट बदलला ( Sambhaji Bhide on Indian people blood group ) पाहिजे आणि तो रक्तगट छत्रपती शिवाजी - संभाजीचे ( Sambhaji Bhide on Shivaji Maharaj in Sangli ) केले पाहिजे, असे विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले आहे. त्याचबरोबर देशाला म्लेंच्छ, अँग्लो आणि गांधी बाधा झाल्याची टीकाही भिडे यांनी केली. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ( Sambhaji Bhide news sangli ) ते बोलत होते.

बोलताना संभाजी भिडे

हेही वाचा - महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यात तरुणाची आत्महत्या

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण - मिरज शहरातल्या शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे मिरजेचे नगरसेवक निरंजन आवटी यांच्या पुढाकाराने सुशोभीकरण झाले आहे. याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी 26 एप्रिल रोजी पार पडला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांच्यासह भाजपा नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

देशाला झाल्यात 'या' तीन बाधा - संभाजी भिडे म्हणाले, व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा, खाण्या पिण्यात विषबाधा होते. पण, याच्यावर उपाय होतो. मात्र, हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ, अंग्लो आणि गांधी बाधा ( Sambhaji Bhide say Gandhi as obstacle ), या तिन्ही बाधांसाठी तोडगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची उपासना आपण सर्वांनी केली पाहिजे. त्याचबरोबर हिंदुस्तान हा जगाचा दाता आहे. हिंदुस्थानला अखंड करण्याची ताकत उभारण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे सर्व समाजाचे रक्त गट बदलले पाहिजे.

केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर हिंदुस्थानातील 123 कोटी लोकांचे रक्त गट बदलले पाहिजे आणि त्यांचा रक्त गट हा छत्रपती शिवाजी - संभाजींचा केला पाहिजे. तो करण्याचा उद्योग छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या उपासानेतून होऊ शकतो, असे मत संभाजी भिडे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, स्वातंत्र्याचे कुंकू टिकवणारा आणि जगाचा संसार चालवणारा हिंदुस्थान जर घडवायचा असेल, तर हे फक्त शिवाजी - संभाजी यांचे विचारच करू शकतात,असा विश्वासही संभाजी भिडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Tushar Gandhi : अजान-हनुमान चालीसाने भुकेचे प्रश्न सुटणार नाही - तुषार गांधी

Last Updated : Apr 27, 2022, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.