ETV Bharat / state

कोरोना रोखण्यासाठी १५ दिवस गावे संरक्षित करा - सदाभाऊ खोत - सदाभाऊ खोत यांच्याबद्दल बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवस गावे संरक्षित करून गावापुरतेच व्यवहार मर्यादित ठेवण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. या विषयी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

sadbhau-khot-has-demanded-that-the-villages-be-protected-for-seven-days-to-prevent-corona
कोरोना रोखण्यासाठी १५ दिवस गावे संरक्षित करा - सदाभाऊ खोत
author img

By

Published : Mar 21, 2020, 7:55 PM IST

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस गावे संरक्षित करून गावापुरतेच व्यवहार मर्यादित ठेवण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना याबाबतची विनंती केली, असल्याची माहिती खोत यांनी दिली आहे.

कोरोना रोखण्यासाठी १५ दिवस गावे संरक्षित करा - सदाभाऊ खोत

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरे आणि गावे मुक्त राखण्यासाठी उपाययोजना म्हणून येत्या १५ दिवसांसाठी गावातील नागरिकांनी दैनंदिन व्यवहार गावापुरतेच मर्यादित ठेवावे, मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यातील सर्व गावे संरक्षित करून एका गावातील व्यक्तींनी दुसऱ्या गावात जाऊ देऊ नये. अत्यावश्यक सुविधा फक्त चालू ठेवण्यात याव्यात. या उपाययोजनांमुळे आपण कोरोनाला आटोक्यात आणू शकू. यामुळे कोणत्या गावात कोरोनासदृश रुग्ण आहेत, हे लक्षात येईल. त्या गावात विशेष उपाययोजना राबवण्यास मदत होईल, असे मतही खोत यांनी व्यक्त केले आहे.

त्याच बरोबर वाहतूक व्यवस्था व सर्व टोलनाके पूर्णपणे बंद करण्यात यावेत. जेणेकरून टोलनाक्यावरील पैसे देवाण - घेवाण या माध्यमातून कोरोना विषाणूचा होणार प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. खासदार, आमदार फंडाच्या माध्यमातून ताप तपासणीचे मशीन गावोगावी देण्यात यावे. अशी विनंतीही आमदार खोत यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.