ETV Bharat / state

कडकनाथ घोटाळा : 'कुटुंबाच्या सहभागाचे पुरावे द्या, राजकारणातून संन्यास घेईन' - सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली आहे. नुकतेच कडकनाथ कोंबडी घोटाळ्यावरून शेट्टी यांनी खोत यांच्या मुलावर आरोप केले होते. या आरोपावरून खोत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sadabhau Khot
सदाभाऊ खोत, माजी मंत्री
author img

By

Published : Jan 23, 2020, 11:27 PM IST

सांगली - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये माझ्या कुटुंबातील कुणी सदस्य असेल, तर टीका करणाऱ्यांनी त्याचे पुरावे द्यावेत. मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टींना दिले आहे. तसेच खोटे आरोप करून राजकीय पोळी भाजणे बंद करा, असा इशाराही त्यांनी शेट्टी यांना दिला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली आहे. नुकतेच कडकनाथ कोंबडी घोटाळ्यावरून शेट्टी यांनी खोत यांच्या मुलावर आरोप केले होते. या आरोपावरून खोत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सदाभाऊ खोत, माजी मंत्री

हेही वाचा - 'उसाच्या एफआरपीबाबत 28 जानेवारीला निर्णय'

यावेळी ते म्हणाले, कडकनाथमध्ये नुकसान झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली, ही वाईट घटना आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या या फसवणुकीवरून काहीजण राजकारण करत आहेत. राजू शेट्टी हे त्यातीलच एक असून ते महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त आहेत. कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्री देण्यात येत होते. मात्र, शेट्टी यांना कॅबिनेट हवे होते आणि ते मिळाले नाही. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन आंदोलन करू लागले आहेत, असा टोला खोत यांनी लगावला.

कडकनाथ प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आपल्या कुटुंबाचा कसलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही. जे आरोप करत आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान खोत यांनी शेट्टींना दिले. तसेच कडकनाथ घोटाळ्यावरून सातत्याने माझ्या कुटुंबावर आरोप होत असतील, तर मी तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार नाही, असा इशाराही खोत यांनी यावेळी दिला.

आमचा पंढरीचा पांडुरंग तुरुंगातच -

आमचा पंढरीचा पांडुरंग हा तुरुंगातच आहे. त्याच्या दर्शनाला खूप वेळा गेलो आहे. भविष्यातही तुरुंगात जाऊ, त्याची चिंता नाही. मात्र, खोटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम विरोधकांनी करू नये, असा इशारा खोत यांनी दिला.

25 वर्षे शेट्टी खासदार होणार नाहीत -

राजू शेट्टी यांना सांगतो की, पुढील 5 नव्हे तर 25 वर्षे तुम्हाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे राजू शेट्टींनी लढायची भाषा बंद करावी. कारण, त्यांच्याकडे लढायला आता माणसंच नाहीत, असा टोला खोत यांनी लगावला.

हेही वाचा - प्रभू श्रीरामाची कृपा..! मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी

Intro:
File name - mh_sng_03_khot_on_shetti_vis_01_7203751-
mh_sng_03_khot_on_shetti_byt_03_7203751

स्लग - कडकनाथ घोटाळयातील माझ्या कुटूंबाच्या सहभागाचे पुरावे पुरावे द्या,राजकारणातुन संन्यास घेईन - सदाभाऊ खोतांचे राजू शेट्टींना आव्हान..

अँकर- कडकनाथ कोंबडी घोटाळया मध्ये माझ्या कुटूंबातील कुणी सदस्य असेल तर त्याचे पुरावे टीका करणाऱ्यानी द्यावेत,मी राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टींना दिले आहे.तसेच खोटे आरोप करून राजकीय पोळी भाजणे बंद करा,असा इशाराही माजी मंत्री खोत यांनी शेट्टी यांना दिला आहे.सांगलीच्या इस्लामपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Body:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात जुंपली आहे.नुकतेच कडकनाथ कोंबडी घोटाळ्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलावर आरोप केले होते.या आरोपावरून माजी मंत्री खोत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.कडकनाथ मध्ये नुकसान झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली ही वाईट घटना आहे. आणिफसवणूक झालेल्या शेतकऱयांना न्याय मिळाला पाहिजे पण शेतकऱ्यांच्या या फसवणुकीवरून काहीजण राजकारण करत आहेत.राजू शेट्टी हे त्यातीलच एक असून ते महाविकास आघाडीत कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने वैफल्यग्रस्त आहेत, कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्री देण्यात येत होतं ,मात्र शेट्टी यांनी कॅबिनेट हवं होतं आणि ते मिळाले नाही,त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन आंदोलन करू लागले आहेत.

तसेच कड़कनाथ प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे,आणि आपला व आपल्या कुटूंबाचा कसलाही त्या प्रकरणाशी संबंध नाही.जे आरोप करत आहेत त्यांनी पुरावे द्यावेत,मी राजकारणातून संन्यास घेईन असं आव्हान यावेळी माजी मंत्री खोत यांनी माजी खासदार शेट्टी यांना दिले आहे.
त्याचबरोबर कडकनाथ घोटाळ्यावरून सातत्यानं माझ्यावर मी कुटुंबावर आरोप होत, असतील तर मी तोंडावर बोट ठेवून गप्प बसणार नाही,असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला आहे.

तसेच एखाद्या प्रकरणाची भीती घालून कुणी अडवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही थांबणार नाही.आमच्या येथे हितचिंतकांना आम्ही तुरुंगात जावे असं वाटत आहे.पण तुरुंग आमच्या पाचवीला पुजला आहे. वीस वर्षात तुरुंगवाऱ्या अनेक केले आहेत.आणि आमचा पंढरीचा पांडुरंग हा तुरुंगातच आहे,त्याच्या दर्शनाला खूप वेळा गेलो आहे,आणि भविष्यातही तुरुंगात जाऊ,त्याची चिंता नाही,मात्र खोटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम करू नये,असा असा इशारा खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे.

तसेच आपण राजू शेट्टी यांनी सांगतो पुढील पाच नव्हे तर 25 वर्षे तुम्हाला हातकणंगले लोकसभा मतदार संघातुन खासदार होण्याची संधी मिळणार नाही,हे आपण आत्मविश्वासाने सांगतो,आणि राजू शेट्टींनी लढायची भाषा बंद करावी कारण त्यांच्या कडे लढायला आता माणसंच नाही.त्यामुळे फसवायचे धंदे बंद करावेत, आधी काँग्रेस बरोबर नंतर भाजप बरोबर आता राष्ट्रवादी बरोबर गेला आहात, त्यामुळे सत्तेत राहून प्रश्न सोडवा.असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे.

बाईट - सदाभाऊ खोत - माजी मंत्री .
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.