सांगली : महाराष्ट्रातून सगळे प्रकल्प एकाच राज्यात (all projects in Maharashtra are going to Gujarat) का नेले जात आहेत? इतर राज्य असताना फक्त गुजरातलाच प्रकल्प का नेले जात आहेत? हा प्रश्न असून; महाराष्ट्रासाठी हे योग्य नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर.आर.पाटील यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातून गुजरातला सगळे प्रकल्प जात आहेत, याचा आता तरुणांनी विचार केला पाहिजे, असे आवाहनही रोहित पाटील (Rohit R R Patil criticized BJP) यांनी केले आहे. ते सांगली जिल्हयातील अंजनी येथे बोलत होते.
महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही : वेदांता फॉक्सकॉन नंतर महाराष्ट्रातून टाटा एअरबसचा प्रकल्प देखील गुजरात मध्ये गेला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यामध्ये एकच गदारोळ सुरू झाला आहे. प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित आर.आर. पाटल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशात महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रातले प्रकल्प एकामागून एक गुजरात मध्ये जात आहेत, देशात अनेक राज्य असताना फक्त गुजरात मध्येच हे प्रकल्प का जात आहेत? असा प्रश्न उपस्थित करत, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नसून; तरुणांनी याचा विचार केला पाहिजे,असे मत देखील रोहित आर आर पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.
रोहित पाटलांचा टोला : त्याचबरोबर नोटावरील फोटो बदलण्याच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर सुरू झालेल्या वादावर बोलतांना रोहित पाटील म्हणाले, अनेक नेते आज नोटा बदलण्याची मागणी करतात. मात्र नोटा बदलून देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था बदलेलं,अशी परिस्थिती नाही. आणि नोटा पुन्हा छापने हे देशाच्या हिताचे देखील नाही. चेहरा चांगला नसेल तर आरसा बदलून काही होत नाही, त्याला चेहरा चांगला करावा लागेल, असा टोला नोटांवरील फोटो बदलण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना रोहित पाटलांनी लगावला आहे.
काय आहे एअरबस प्रकल्प? गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी गुजरातला मोठी भेट मिळाली आहे. C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टची निर्मिती वडोदरात होणार आहे. हा प्रकल्प 'मेक इन इंडिया' देशांतर्गत विमान निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे भारतीय हवाई दलासाठी (IAF) वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पाची एकूण किंमत 21,000 कोटी आहे. Rohit R R Patil criticized BJP