सांगली - राष्ट्रवादीकडून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का देण्यात आला आहे. तासगावच्या किंदरवाडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित आर.आर.पाटील यांच्या गटाने भाजपा खासदार संजयकाका पाटील गटाचा धुव्वा उडवत ग्रामपंचायतवर एक हाती सत्ता मिळवली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी- राष्ट्रवादीची युवा नेते रोहित आर.आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजपाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही जबर धक्का दिला आहे. भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या किंंजरवाडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने भाजपा खासदार संजयकाका पाटील यांच्या पॅनलचा धुवा उडवत 7 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे.
उमेदवारांचे डिपॉझिट जप्त - तसेच भाजपाच्या काही उमेदवारांचा डिपॉझिट देखील जप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील आणि भाजपचे खासदार संजय काका पाटील या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यात रोहित पाटील यांनी मोठी बाजी मारली आहे.
हेही वाचा - Vadgaon Kolhati Gram Panchayat: औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाचा एकहाती विजय
हेही वाचा - Mumbai High Court : मंत्रीच नाही तर आदेश कुणाला देऊ?; मुंबई उच्च न्यायालयाची मंत्रिमंडळ विस्तारावर टिप्पणी