ETV Bharat / state

दारू दुकानांसह इतर दुकाने उद्यापासून सुरू; पाहा सांगलीत काय सुरू राहणार

सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने सोमवारपासून अनेक निर्बंध प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कंटेंनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नसल्याचे सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दारू दुकानांसह इतर दुकाने उद्यापासून सुरू; पाहा सांगलीत काय सुरू राहणार
दारू दुकानांसह इतर दुकाने उद्यापासून सुरू; पाहा सांगलीत काय सुरू राहणार
author img

By

Published : May 3, 2020, 6:22 PM IST

सांगली - जिल्ह्यात दारू दुकानांसह अन्य दुकाने सोमवारपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. मात्र, बाजारपेठेतील कोणतेही दुकाने उघडता येणार नाहीत. तसेच लग्न कार्यावरील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इस्लामपूर शहर कंटेनमेंट झोन मुक्त करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले.

सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेल्याने सोमवारपासून अनेक निर्बंध प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कंटेंनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात येणार नसल्याचे सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांना खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र मास्क, सामजिक अंतर आणि कोरोना नियम पाळणे गरजेचे आहे. तसेच ६५ वर्षीय व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षाच्या आतील मुलांना मात्र घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अत्यावश्यक कारणासाठी फक्त या सर्वांना बाहेर पडता येणार आहे.

सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी
सांगलीमध्ये काय सुरू होणार?रहिवाशी क्षेत्रात पाच दुकाने जीवनावश्यक वस्तूंबरोबर इतर सर्व दुकाने हेअर सलून, ब्युटी पार्लर .दारू दुकाने, फक्त पार्सल लग्नकार्याला ५० लोकांची परवानगी अंत्यविधीला २० लोकांना परवानगी सर्व उद्योग सुरू करण्याला परवानगी. मात्र, मजूर व कामगारांची जबाबदारी व नियम पाळून कारखाने सुरू करण्याची अटप्रवासासाठी टॅक्सी, रिक्षा, दुचाकी यांना सोशल डिस्टन्स पाळून वाहतूक करण्याची परवानगी ग्रामीण भागासह शहरी भागातील बांधकामांना परवानगी तर शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशी क्षेत्रात किराणामाल दुकानाबरोबर इतर पाच दुकाने फक्त सुरू करता येणार आहेत. एका रांगेत एकापेक्षा पाच दुकाने असतील तर त्याठिकाणी दुकाने सुरू करता येणार नाहीत, असे यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले.खासगी कार्यालये ३३ टक्के मनुष्यबळाचा वापर करून सुरू करू शकतील. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये ही उपसचिव व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती ही १०० टक्के तर ३३ टक्के इतर कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. तथापि, संरक्षण आणि सुरक्षा सेवा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पोलीस, कारागृह, गृहरक्षक, नागरी संरक्षण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित सेवा, एनआयसी, सीमा शूल्क, एफसीआय, एनसीसी, एनवायके आणि महानगरपालिका सेवा कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू राहतील. तसेच जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आणि येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयाची परवानगी आवश्यक असून पासशिवाय कोणालाही जाता येणार नाही.हे मात्र बंदच राहणार -शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध क्लासेस यांना बंदी. ऑनलाईन/ इ-लर्निग शिक्षणाला परवानगी. सर्व सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, तरणतलाव, करमणूक संकुले, नाट्यगृहे, परमीट रूम बार आणि ऑडिटोरियम, हॉल तसेच पान व तंबाखूजन्य पदार्थांवर विक्री करण्यास बंदी आहे.तसेच सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक सण आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी. सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे यांनाही बंदी कायम असून धार्मिक कारणासाठी एकत्र येण्यावरही बंदी आहे.त्याचबरोबर कंटेंनमेंट झोन असणाऱ्या इस्लामपूर शहरावरील कंटेनमेंट झोन रद्द करण्यात येणार आहे. २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने तेथील कंटेनमेंट झोन उठवण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागकडे पाठवण्यात आला आहे, तर कंटेनमेंट झोनमधील १०० टक्के नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले. तसेच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास कलम 144 नुसार बंदी कायम असून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.