ETV Bharat / state

कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला ओळखत नाही; कचरा प्रश्नावरून संतापलेल्या पूरग्रस्तांनी महापौरांना सुनावले

कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला ओळखत नाही... अशा तीव्र शब्दांत निंदा करत चौकशीसाठी आलेल्या महापौरांना पूरग्रस्तांनी चांगलेच धारेवर धरले आहे. शहराच्या उपनगर भागातील पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करून काकानगर परिसरातील पूरग्रस्तांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे.
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:12 PM IST

सांगली - कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला ओळखत नाही..गेले १२ दिवस कुठे होता? अशा तीव्र शब्दांत पूरग्रस्तांनी चौकशीसाठी आलेल्या महापौरांना चांगलेच धारेवर धरले आहे. शहराच्या उपनगर भागातील पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

शहरातील पूर ओसरल्याने आता स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. मात्र, उपनगरातील काही भागांमध्ये असलेला कचरा पालिका प्रशासनाकडून अद्याप उचलण्यात आलेला नाही. तसेच या ठिकाणच्या पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप काकानगर परिसरातील पूरग्रस्तांनी केला आहे. या कचरा प्रश्नी संतापलेल्या नागरिकांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे. त्यावेळी त्यांनी महापौर खोत यांना धारेवर धरले.

पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करून काकानगर परिसरातील पूरग्रस्तांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे.

शहरातील बायपास रोडवरील चौकात पूरग्रस्तांनी रस्ता रोखून धरला होता. यामुळे सांगली-इस्लामपूर व नांद्रे -पलूस मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आयुक्तांना संतप्त पूरग्रस्तांनी घेराव घालून तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनीही या घटनास्थळी धाव घेतल्यावर संतप्त महिलांनी महापौर खोत यांना चांगलेच धारेवर धरले.

अखेर तातडीने मदत तसेच कचरा उचलण्याच्या आश्वासनानंतर पूरग्रस्तांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, शहराच्या अनेक भागात अद्यापही साफसफाई मध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. यामुळे पूरग्रस्तांमधून संताप व्यक्त होत आहे.

Intro:
Feed send FTP

File name - mh_sng_01_purgrast_andolan_vis_1_7203751 - to - mh_sng_01_purgrast_andolan_vis_4_7203751

स्लग - मदत आणि कचरा उठाव होत नसल्याने संतप्त पूरग्रस्तांना केला रास्ता रोको,आयुक्तांना घेराव घालत महापौरांना धरले धारेवर...

अँकर - मदत आणि कचरा उठाव होत नसल्याने,संतप्त पूरग्रस्तांना सांगलीमध्ये आज रास्ता रोको आंदोलन केला आहे. यावेळी महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांना घेराव घालत,महापौरांना धारेवर धरलं.सांगलीच्या बायपास रोडवर पूरग्रस्त रस्त्यावर उतरले होते.
Body:सांगली शहरातला पूर ओसरला आहे, त्यामुळे सांगली शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम आणि कचरा उठाव सुरू आहे.मात्र उपनगर असणाऱ्या भागांमध्ये पाणी ओसरल्यानंतर निर्माण झालेला कचरा पालिका प्रशासनाकडून अद्याप उचलण्यात येत नाही.त्याचबरोबर या ठिकाणच्या पूरग्रस्तांना अद्याप कोणती मदतही मिळत नाही,असा आरोप करत काकानगर परिसरातील पूरग्रस्तांना रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे .सांगलीच्या बायपास रोडवरील चौकात यावेळी पूरग्रस्तांना रस्त्यावर ठिय्या मारत वाहतूक रोखून धरली होती.सांगली-इस्लामपूर आणि नांद्रे -पलूस मार्गावरची वाहतूक यामुळे ठप्प झाली होती.तरी याची माहिती मिळताच ,या ठिकाणी दाखल झालेले महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना संतप्त पूरग्रस्तांना घेराव घालत तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत यांनीही या घटनास्थळी धाव घेतली असता ,संतप्त पूरग्रस्त महिलांनी महापौर खोत यांना चांगलेच धारेवर धरलं. अखेर तातडीने मदत आणि कचरा उठाव करण्याच्या आश्वासनानंतर पूरग्रस्तांना आपले आंदोलन मागे घेतलं. मात्र शहराच्या अनेक भागात अद्याप कचरा उठाव मध्ये मोठी दिरंगाई होत,असल्याचे चित्र समोर येत आहे .त्यामुळे पूरग्रस्तांच्या मधून संताप व्यक्त करण्यात येतोय.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.