सांगली : शहराची शान असणारा कृष्णा नदीवरील आयर्विन पूलास 93 वर्ष पूर्ण झाले ( Irvine Bridge 93rd birthday ) आहेत. यानिमित्ताने सांगलीकरांनी आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा केला आहे. 93 वर्ष पूर्ण करून 94 व्या वर्षांमध्ये पदार्पण करणाऱ्या आयर्विन पुलावर सांगलीकरांनी रांगोळी काढून आणि पणत्या लावून आयर्विन पुलाचा वर्धापन दिवस साजरा केला ( Decoration of rangoli on bridge ) आहे.
पुलावर रांगोळी आणि पणत्या : सांगली शहराला आणि जिल्ह्याला समृद्ध बनवणारा म्हणून आयर्विन पूल मानला जातो,ब्रिटिश काळामध्ये तत्कालीन पटवर्धन संस्थानांनी हा आयर्विन पूल बांधला,14 फेब्रुवारी 1927 रोजी या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली, आणि 18 नोव्हेंबर 1929 मध्ये हा आयर्विन पूल बांधून तयार झाला. वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून या आयर्विन पुलाकडे देखील पाहिलं जातं.
काळा-लाल दगड,शिसेचा वापर : सांगली शहरातील काळा दगड आणि कर्नाटकातील गोकाक येथील लाल दगड,शिसे यांचा वापर करून हा पूल ( bridge made using black stone red stone and lead ) बांधण्यात आला. तर हा पूल उभारताना यावर रेखीव आणि देखण्या रुपाची हस्तकला ही करण्यात आली,12 कमानींच्या जोरावर हा भव्य दिव्य पुल उभारला आहे.तर या पुलाला त्यावेळी 6 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला. आणि पटवर्धन संस्थानिकांनी मोठ्या थाटामाटात या पुलाचे उद्घाटन भारताचे ब्रिटिश राजवटीचे तत्कालीन गव्हर्नर एडवर्ड फ्रेडरिक लेंडीली वुड यांच्या असणारे आयर्विन या पदाच्या नावावरून आयर्विन पूल असे नाव देण्यात आले.
आयर्विन पुलाला समांतर पूल : सांगलीच्या जडणघडणीचा साक्षीदार असणाऱ्या ऐतिहासिक आयर्विन पुलाचे जतन कऱण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती, त्यानंतर स्थानिक आमदार सुधीर गाडगीळ आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकार आयर्विन पुला शेजारीचं समांतर पूल आता कृष्णानदी वर बांधण्यात येत आहे,यामुळे आयर्विन पुलाचे आयुष्य आणखी वाढेल असे मत सांगलीकर व्यक्त करतात.