ETV Bharat / state

शिवसेना-भाजपने एकत्र येऊन पुन्हा सरकार बनवावे - रामदास आठवले

author img

By

Published : Feb 25, 2020, 4:09 PM IST

राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची केलेली घोषणा फसवी निघाली आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

Ramdas Aathvale
रामदास आठवले

सांगली - राज्यातील महाआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकत्र यावे. आपण मिळून सरकार बनवू असे, आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. यावेळी आठवलेंनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही केली. मिरजेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री

राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची केलेली घोषणा फसवी निघाली आहे. केंद्र सरकारच्या एनआरसी, सीएए व एनपीआर कायद्याच्या बाबतीत बोलताना एनआरसी हा फक्त आसाम पुरता लागू होता. तो कोणत्याही राज्यात येणार नाही, त्यामुळे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व धोक्यात येणार नाही. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण करत आहेत, आरोप आठवले यांनी केला.

भाजप खासदार नारायण राणे यांनी 11 दिवसात महाविकास आघाडी सरकार पडेल, या वक्तव्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, 11 नाही तर 15 दिवसात सरकार पडेल. पण, महाविकास आघाडी सरकार फार दिवस चालेल, असे आपल्याला वाटत नाही. कारण, आघाडीमध्ये वैचारिक वाद आहेत. सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आणि भाजपने एकत्र यावे, आपण सरकार बनवू, असे वक्तव्य आठवले यांनी केले.

राज्यसभा उमेदवारी वाद -

उदयनराजे भोसले आणि संजय काकडे यांच्यात उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावर बोलताना आठवले म्हणाले, उदयनराजे भोसले आणि संजय काकडे हे दोघेही माझे मित्र आहेत. पण, कोणाला उमेदवारी मिळणार हे माहिती नाही. तो भाजपमधील प्रश्न आहे. मात्र, मला शंभर टक्के उमेदवारी मिळणार, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.