ETV Bharat / state

'निवडणूक लढवण्यासाठी शेतकऱ्यांची ४ लाखांची मदत, विरोधकांसाठी हेच पुरेसे उत्तर' - रघुनाथदादा पाटील

निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी ४ लाखांचा निधी मदत म्हणून सर्वसामान्य शेतकरी व जनतेने दिला आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना हे उत्तर पुरेसे आहे, असे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टींचा रघुनाथदादा पाटलांना टोला
author img

By

Published : Mar 16, 2019, 6:00 PM IST

सांगली- निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वी ४ लाखांचा निधी मदत म्हणून सर्वसामान्य शेतकरी व जनतेने दिला आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्या विरोधकांना हे उत्तर पुरेसे आहे, असे हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये बोलत होते.

शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, की शेतकऱ्यांची घरे उभी केली, हे २३ एप्रिलला कळेल, असा टोलाही शेट्टी यांनी यावेळी रघुनाथदादा पाटील आणि शिवसेनेकडून लढणारे धैर्यशील माने यांना लगावला आहे.
सांगली आणि कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. लक्षवेधी लढत असणाऱ्या या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली होती. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून मतदारसंघाचे वाटोळे केल्याचा, आरोप त्यांनी सांगलीमध्ये केला होता. या आरोपांना खासदार शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राजू शेट्टींचा रघुनाथदादा पाटलांना टोला

रघुनाथदादा पाटील यांनी २ वेळा माझ्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली आहे. एकदा शिवसेनेकडून, दुसऱ्यांदा आम आदमी पार्टीकडून आणि आता कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतात, हे मला माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांकडून ४ लाख रुपयांचा निधी निवडणुकीसाठी मिळाला आहे. प्रत्येक घरातून या निवडणुकीसाठी मदत होत आहे. हे चित्र विरोधकांच्या आरोपांना पुरेसे आहे, असे शेट्टी यावेळी म्हणाले.

या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून लढणारे धैर्यशील माने यांनी, राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राजू शेट्टी यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, की शेतकऱ्यांची घरे उभी केली हे येत्या २३ एप्रिलला कळेल, असे प्रत्युतर त्यांनी धैर्यशील मानेंना दिले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_16_MARCH_2019_RAJU_SHETTI_ON_RAGHUNATH_PATIL_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_16_MARCH_2019_RAJU_SHETTI_ON_RAGHUNATH_PATIL_SARFARAJ_SANADI

स्लग - अर्ज भरण्यापूर्वी निवडणूक लढवण्यासाठी चार लाख लाखांची शेतकरयांची मदत,हेच विरोधाकांसाठी पुरेसा उत्तर - स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी ..

अँकर - अर्ज भरण्यापूर्वी निवडणूकीसाठी चार लाखांचा निधी मदत म्हणून सर्वसामान्य शेतकरी व जनतेने मला दिले असून आरोप करणाऱ्या विरोधाकांने हेच उत्तर पुरेसे असून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसली की शेतकरयांची घरे उभी केली.हे २३ एप्रिलला कळेल,असे प्रत्युत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी,शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील
माने यांना दिले आहे.ते कोल्हापूरच्या जयसिंगपूर मध्ये बोलत होते.

Body:व्ही वो - सांगली आणि कोल्हापूर च्या हातकणंगले मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. लक्षवेधी लढत असणाऱ्या या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते व हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले रघुनाथदादा पाटील यांनी टीका केली होती.राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक आणि मतदारसंघाचा वाटोळे केल्याचा आरोप सांगलीमध्ये केला होता.आज या आरोपांना खासदार राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.रघुनाथदादा पाटील यांनी दोन वेळा माझ्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली आहे.एकदा शिवसेनेकडून, दुसऱ्यांदा आम आदमी पार्टीकडून आणि आता कोणत्या पक्षात निवडणूक लढवतात हे मला माहीत नाही,असा टोला लगावत. निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या कडून चार लाख रुपयांचा निधी निवडणुकीसाठी मला मिळाला आहे आणि प्रत्येक घरातून या निवडणुकीसाठी मला मदत होत आहे आणि ही चित्र विरोधकांच्या आरोपांना पुरेसा आहे असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केला आहे.
तर या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून लढणारे धैर्यशील माने यांनी, राजू शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना राजू शेट्टी यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे ,की शेतकऱ्यांची घरं उभी केली आहेत.हे येत्या २३ एप्रिल रोजी कळेल असं सूचक उत्तर शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.

बाईट - राजू शेट्टी - खासदार , स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.