सांगली - ज्या लायकीचे लोक, त्याच लायकीचे लोकप्रतिनिधी, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनाकडे शेतकरी पाठ फिरवित असल्याच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींनी खडेबोल शेतकऱ्यांना ( Raju Shetti Slammed farmers ) सुनावले आहेत. तासगाव येथे शिवार कृषी प्रदर्शनाचे ( Shivar Krushi Pradarshan in Tasgaon ) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्वभिमानी शेतकरी संघटना सांगली ( Swabhimani Shetkari Sanghatna Sangli ) यांच्यावतीने तासगाव या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाले. या निमित्ताने आयोजित सभेमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील एफआरपी ही सर्वाधिक
राजू शेट्टी म्हणाले, की लोक जर स्वतःच्या हक्काबाबत जागृत नसतील, बेफिकिर असतील तर त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही बेफिकिर असतील. सांगली जिल्ह्यात तो अनुभव घेत आहोत. कारण शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात आज दोन महिने झाले. नियमित एफआरपी 14 दिवसांच्या आत जमा केली ( Raju Shetti on FRP for farmers ) जात आहे. वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील एफआरपी ही सर्वाधिक आहे. मात्र तरीदेखील शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा होत आहे. सांगली जिल्ह्यात मात्र ती होत नाही. याचा खरे तर शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे. सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलने करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनी अक्षरशः त्याकडे पाठ फिरवली. मग शेतकऱ्यांना गरज नाही का ? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-Omicron Variant Updates : राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, तर 877 नवे कोरोना बाधित