सांगली - एकरकमी एफआरपीवर आम्ही ठाम आहोत. मात्र केंद्र सरकारने तीन तुकड्यात देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावर कळस म्हणजे राज्य सरकार वर्षभरात तीन तुकड्यात एफआरपी देऊ, असे म्हणत आहे. खरं तर ही दोन्ही सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. मात्र आम्ही यांना गुडघे टेकायला लावू आणि एक रकमी एफआरपी घेऊ, तसेच महाविकास आघाडी व भाजपामधील नेत्यांना दिवाळी करू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये आज शिवार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
हे ही वाचा - आभाळच कोसळले : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त, पाहा विशेष रिपोर्ट...
शेतीमालाला आधी भाव मिळला पाहिजे -
शेतकरी आत्महत्यांवर शेट्टी म्हणाले, उत्पादनापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकला जात आहे. तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर आणि बँकांचा तगादा यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे चित्र बदलायचे असेल तर शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली.