सांगली - मनसे नेते राज ठाकरे यांचा अजामीनपात्र वॉरंट अखेर रद्द झाला आहे. शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांना ( Raj Thackeray Non-bailable warrant revoked ) सुनावणीस गैरहजर राहिल्या प्रकरणी दोन वेळा अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. याविरोधात इस्लामपूर न्यायालयामध्ये राज ठाकरेंच्याकडून धाव घेण्यात आली होती. यावर इस्लामपूर सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांचा जामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे. त्याबरोबर पुढील सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंना दिलासा मिळाला आहे.
राज ठाकरेंनी न्यायालयाचा दिलासा : रेल्वे भरती प्रकरणी आंदोलनातून मनसे नेते राज ठाकरे यांना 2008 साली अटक झाली होती. त्याचे संतप्त पडसाद राज्यात उमटले होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी याठिकाणीही मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांचे नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यामध्ये तानाजी सावंत यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, शिरीष पारकर यांच्यासह अन्य दहा जणांच्यावर गुन्हा दाखल झाले होते. याप्रकरणी शिराळा सत्र न्यायालयामध्ये खटला सुरू असून, मात्र सुनावणीसाठी राज ठाकरे वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. मुंबई पोलिसांना राज ठाकरे यांना पकडून आणण्याचे वॉरंट जारी केले होते.
अजामीनपात्र वॉरंट रद्द : 9 जून रोजी शिरीष पारकर यांनी शिराळा न्यायालयामध्ये हजर होऊन अजामीनपात्र वॉरट रद्द केला होता. तर राज ठाकरे यांच्या वकिलांकडून राज ठाकरे यांचा वॉरंट रद्द करणयाबाबत अर्ज दिला होता. मात्र तो अर्ज शिराळा न्यायालयाने नामंजूर केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी इस्लामपूर न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान इस्लामपूर सत्र न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी पार पडली. ज्यामध्ये इस्लामपूर न्यायालयाने राज ठाकरे यांचा अजामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांना या पुढील सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Mumbai High Court : उच्च न्यायालयात माजी सैनिकाचा नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न