सांगली: शिराळा न्यायालयाकडून Shirala Court मनसे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांचा गुन्ह्यातून मुक्त करण्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. शेंडगेवाडी येथील आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंच्यासह मनसे नेत्यांच्यावर शिराळा पोलीस ठाण्यामध्ये Shirala Police Station दाखल असलेल्या गुन्ह्यातून मुक्तता करण्याबाबत ठाकरेंच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला होता.
रेल्वे भरती प्रकरणी शिराळा तालुक्यातल्या शेडगेवाडी या ठिकाणी 2008 साली राज ठाकरे यांनी रेल्वे भरती प्रकरणी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेडगेवाडी येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान हिंसक वळण लागलं होतं. या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर व सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी सदर खटल्याची सुनावणी शिराळा न्यायालयामध्ये सुरू असून या सुनावणीच्या तारखेला मनसे प्रमुख राज ठाकरे वारंवार गैरहजर राहत असल्याने शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट देखील बजावला होता. मात्र नंतर हे वॉरंट रद्द करण्यात आलं. त्यानंतर तर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्यावतीने सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्याचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घडतेवेळी ते दोघेही उपस्थित नव्हते, तर ते अन्य गुन्ह्याच्या कामी अटकेत होते. त्यांच्याविरुध्द केस चालविण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे त्यांची सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी, असा अर्ज केला होता.
रेल्वेमध्ये होत असलेल्या भरतीचा विरोध दरम्यान सदर अर्जास आज सरकार पक्षातर्फे सरकारी वकील संदीप पाटील यांनी हरकत घेतली की, सदर गुन्हा हा त्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे घडला आहे. सदर गुन्ह्यास त्यांनी परावृत्त केल्यामुळे आरोपींनी शेडगेवाडी फाटा येथे बंद पुकारला व परप्रांतीय लोकांच्या रेल्वेमध्ये होत असलेल्या भरतीचा विरोध केला. त्यामुळे व्यापा-यांना बंद पाळावा लागला. या गुन्ह्यात त्यांचा सकृतदर्शनी सहभाग असून त्याकरिता न्यायालयात खटला चालविणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर व्हावा, अशी विनंती सरकारी वकिलानी केली. तर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून व उपलब्ध पुराव्याचे आधारे शिराळा न्यायालयाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांचा अर्ज नामंजूर केला आहे.