सांगली - एका खासगी वर्ग घेण्याऱ्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पीडित मुलगी अल्पवयीन असून ती पाच महिन्याची गर्भवती आहे. सांगलीच्या मिरज येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासगी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
सुनील करपे असे अटक करण्यात आलेल्या क्लास चालकाचे नाव आहे. तो मिरज येथे खासगी क्लास चालवितो. पीडित मुलगी 15 वर्षाची असून ती नवव्या वर्गात शिकत आहे. ती सुनील करपे यांच्या खासगी क्लासला जात होती. तसेच करपे याने पिडीत मुलीच्या घरी जेवणाचा डब्बा देखील लावला होता. त्यामुळे तिच्या घरी त्या शिक्षकाचे जाणे-येणे जास्त होते. दरम्यान खासगी शिक्षकाने पीडित मुलीशी प्रेमसबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यातून तिला दिवस जावून ती पाच महिन्याची गर्भवती राहिली. तिच्या घरी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी लगेच मिरजेतील गांधी चौकी पोलीस ठाणे गाठले.
शहरातील एका खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याने खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी सुनील करपे यास ताबडतोब अटक केली. करपे यांच्याविरोधात बलात्कार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, अॅस्ट्रॉसिटी असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी करपे यांच्या खाजगी क्लासची पाहणी केली.