सांगली - महाराष्ट्रात काही झालं तरी विरोधक राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात. आतापर्यंत आठ ते नऊ वेळा मागणी केली आहे. दर महिन्याला ही मागणी होत असते, त्यात नवीन काही नाही,असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे. ते सांगलीच्या आष्टा येथे बोलत होते.
हेही वाचा - नागपूर: फॉर्च्यून मॉलच्या पार्किंग मध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्य
राष्ट्रपती राजवट मागणी दर महिन्याला ..
राज्यातील सध्याच्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपाकडून राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे, या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात काही झाले तरी राष्ट्रपती राजवट लागू झालीच पाहिजे,अशी मागणी होते.राज्यातल्या भाजपाकडून आत्तापर्यंत आठ ते नऊ वेळा राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. तसेच महिन्यातून विरोधकांकडून एक-दोन वेळा राष्ट्रपती राजवटीची मागणी होत असते.यात काही नवीन नाही,अशा शब्दात जयंत पाटलांनी टोला लगावला आहे.
हेही वाचा - राज्यात पोलिसांच्या बदल्यांसाठी काम करतात एजंट; रश्मी शुक्लांच्या पत्रामध्ये गौप्यस्फोट
गृहमंत्री बदलणार नाही
सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर गृहमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील बदल्यांची चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यातील मंत्री मंडळात कोणत्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता नाही.आमच्या मनात तसा विचारही नाही,असं सांगत गृहमंत्री बदलले जाणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.