सांगली - लोक वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून समाजाच्या सेवेसाठी मोफत रुग्ण वाहिका देण्यात आली. इस्लामपूरातील वाळवा तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व सर्व दैनिकाचे पत्रकार यांच्या हस्ते रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
संबंधित सेवा शेवटच्या घटकांपर्यंत मोफत सेवा पोहोचवणार असून गरजू गरीब व इतर ही रुग्णांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आव्हान दिग्विजय पाटील यांनी केले आहे. या सेवेचा वारणा पट्ट्यातील तसेच जिल्ह्यातील प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रहारचे बंटी नांगरे पाटील, संपत कांबळे इंद्रजीत, महाडिक प्रकाश सुतार, असलम मुजावर तसेच सचिन महाडिक उपस्थित होते.