ETV Bharat / state

वीज उपकेंद्रात स्फोट होऊन लागली भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान

खानापूर तालुक्यातील कार्वे येथील महापारेषणच्या वीज उपकेंद्राला आग लागली. या आगीमुळे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले.

power-substation-exploded-and-caught-fire-in-sangli
वीज उपकेंद्रात स्फोट होऊन लागली भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान
author img

By

Published : May 5, 2020, 10:04 PM IST

सांगली - खानापूर तालुक्यातील कार्वे येथील महापारेषणच्या वीज उपकेंद्राच्या ट्रान्सफार्मरमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये वीज उपकेंद्राचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या वीज उपकेंद्रातील भीषण स्फोटाने कार्वे हादरून गेले होते.

वीज उपकेंद्रात स्फोट होऊन लागली भीषण आग, कोट्यवधीचे नुकसान

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील विटा नजीकच्या कार्वे येथील महापारेषणच्या सब स्टेशनला मंगळवारी भीषण आग लागली. सायंकाळच्या सुमारास केंद्रात अचानक आगीचे लोळ उठले आणि त्यानंतर काही क्षणात दुसऱ्या बाजूच्या ट्रान्सफार्मरमध्ये स्फोट होऊन उंच अवकाशात आगीचे लोळ उठले. बघता बघता या आगीने याठिकाणी रौद्र रूप धारण केले. यानंतर आसपासच्या परिसरात असणारा वीजपुरवठा खंडित झाला.

या भीषण स्फोट आणि आगीची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुमारे एक तास याठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या भीषण आगीमध्ये या उपकेंद्राचे अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.