ETV Bharat / state

अबब..डाळिंबाला सोन्याचा भाव! किलोला 1हजार 151 दर

author img

By

Published : Jan 9, 2021, 7:49 AM IST

आटपाडीच्या डाळिंबांना सध्या इतिहासातील हा सर्वात उच्चांकी दर सोन्याचा भाव मिळतो आहे. एका किलोला 1151 इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

pomegranate got golden price
आटपाडीच्या डाळिंबांना सोन्याचा भाव!

सांगली - आटपाडीच्या डाळिंबांना सध्या इतिहासातील हा सर्वात उच्चांकी दर सोन्याचा भाव मिळतो आहे. एका किलोला 1151 इतका उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

अतिवृष्टीमुळे डाळींबाला जबर फटका
सांगली जिल्ह्यातल्या डाळिंब क्षेत्रावर गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीने मोठा घाला घातला आहे. जवळपास जिल्ह्यातील 90 टक्के डाळिंबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. डाळिंब उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परदेशात सुद्धा जेमतेम डाळिंब निर्यात झालेला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा 10% डाळिंबांच्या बागा बहरल्या आहेत. त्यामुळे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून डाळिंबांना स्थानिक बाजारात उच्चांकी दर मिळाला आहे.

डाळिंबाचे आगार उध्वस्त
डाळिंबाचे आगार म्हणून आटपाडी तालुक्याची ओळख आहे. जिल्ह्यातल्या डाळिंबाच्या क्षेत्रापैकी केवळ आटपाडी तालुक्यात 60 टक्के क्षेत्र आहे. गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे डाळिंबाचे क्षेत्र हे जमिनदोस्त झाले. मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बाग प्रचंड कष्टाने फुलवल्या आहेत. या डाळिंबांना आटपाडीच्या बाजार समितीत उच्चांकी दर मिळत आहेत.

इतिहासातील विक्रमी दर
गुरुवारी आटपाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब बाजारात शेटफळे येथील शेतकरी रुपेश बाळू गायकवाड यांच्या ग्रेड वन या डाळिंबाला विक्रमी 1 हजार 151 रुपये प्रति किलो भाव मिळाला. डाळींब सौदे बाजाराच्या इतिहासातील हा उच्चांकी दर ठरला आहे.गायकवाड यांच्या ग्रेड वनचे चार कॅरेट 96 किलो वजनाचे होते.याला उच्चांकी 1151 रुपये प्रति किलो भाव मिळाला. यातून तब्बल एक लाख दहा हजार 496 रुपये गायकवाड यांना मिळाला आहे.

डाळिंबाला सोन्याचा भाव
गेल्या एक महिन्यापासून आटपाडी बाजार समितीच्या आवारात डाळींबाचे सौदे पार पडत आहे. या ठिकाणी डाळिंबाची आवक कमी प्रमाणात होत आहे आणि उच्च दर्जाच्या डाळिंबांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे डाळिंबांना चढे दर मिळत आहेत. 551 पासून 800 रुपये इतका उच्चांकी दर महिन्याभरात डाळिंबाला मिळाला आहे. मात्र हा उच्चांकी दराचा रेकॉर्ड रुपेश गायकवाड यांच्या डाळिंबांनी मोडून काढला आहे. त्यांच्या डाळिंबाला 1151 रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

हेही वाचा - ट्रम्प यांनी 'रिपब्लिकन' नावाचा अवमान केला, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा करेन - आठवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.