ETV Bharat / state

सांगलीत मतदान केंद्रावर पोलिसांचा लाठीचार्ज - Police baton charge in sangali

सांगलीच्या भिलवडी गावात मतदान केंद्रामध्ये गर्दी झाली. त्यामुळे लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

सांगलीत मतदान केंद्रावर पोलिसांचा लाठीचार्ज

author img

By

Published : Dec 1, 2020, 3:15 PM IST

Updated : Dec 1, 2020, 3:24 PM IST

सांगली - पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र सांगलीत भिलवडी गावात मतदान केंद्रावर गर्दी झाली. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. भिलवडी गावात पुणे पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे.

गर्दी झाल्याने पोलिसांचा लाठीचार्ज

सांगलीत मतदान केंद्रावर पोलिसांचा लाठीचार्ज

सांगली जिल्ह्यामध्ये पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. सकाळपासून मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी लगबग पहायला मिळत आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असणाऱ्या मतदान केंद्रावर पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. त्यामुळे काहीवेळ याठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या तालुक्यातील भाजपाचे उमेदवार संग्रामसिह देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपा उमेदवारांना तब्बल 57 संघटनांचा पाठिंबा -

या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण स्मारक समिती, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना, मराठवाडा मित्र मंडळ पिंपरी-चिंचवड शहर, पिंपरी-चिंचवड मुस्लिम महासंघ, मेडिकल असोसिएशन, श्रीक्षेत्र ओरिसा मित्रमंडळ, राजपूत समाज संघटना, विदर्भ मित्र मंडळ, विश्वभारती बंगाली असोसिएशन, सोसायटी फेडरेशन, कोकण विकास मंच, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र राज्य, कपिलवास्तु बुद्ध विहार समिती, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटना, शिवगर्जना कामगार संघटना, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना, अखिल युवा पत्रकार संघ, मावळ असोसिएशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, फॅमिली डॉक्टर असोसिएशनसह एकूण 57 संस्था व संघटनांनी भाजपाला लेखी समर्थन दिले आहे.

पुण्यात पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी उत्साहात मतदान

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. पुणे शहरामध्ये सकाळपासूनच मतदार मतदानासाठी लगबगीने निघाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विभागात सर्वात जास्त मतदार पुणे शहरात आहेत. मतदान केंद्रांवर कोविड - 19 च्या दृष्टीने सुरक्षा म्हणून सॅनिटायझर, टेम्परेचर स्क्रिनिंग करण्यात येत आहे.

हेही वाचा- पदवीधर-शिक्षक निवडणूक : धीम्या गतीने मतदान सुरू; पाहा LIVE अपडेट्स..

हेही वाचा- लंका प्रीमियर लीगमध्ये युवा खेळाडूवर संतापला आफ्रिदी, म्हणाला...

Last Updated : Dec 1, 2020, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.