सांगली : कृष्णा नदीपात्रातील ( Krishna River ) लाखो मासे मृत्यूप्रकरणी ( Death of Lakhs of Fish ) पुण्याच्या हरित लवादा ( Green Arbitrator ) न्यायालयात स्वतंत्र भारत पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार, प्रदूषण महामंडळ आणि कराडच्या कृष्णा साखर कारखान्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली असून, कृष्णा नदीतील मासे मृत्युप्रकरणी समिती गठीत करून कारवाई करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे ( Sunil Farate ) यांनी याचिकेद्वारे केली आहे.
कृष्णा नदीपात्रात 15 दिवसांत 2 वेळा मासे मृत्युमुखी : पलूसच्या आमणापूरपासून सांगलीच्या हरिपूरपर्यंत लाखो मासे तडफडून मेल्याचा प्रकार समोर आला आहे. कृष्णाकाठी अनेक ठिकाणी मृत माशांचा खच पडला होता. तर काठावर ऑक्सिजनसाठी तडफडणारी मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. तर यानंतर प्रदूषण महामंडळाकडून नदीच्या पात्राची पाहणी करीत पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. तर प्राथमिक तपासात नदीपात्रात कोणत्याही प्रकारचे रासायनयुक्त पाणी मिसळले नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुन्हा 5 दिवसांपूर्वी कृष्णा नदीपात्रातील हजारे मासे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.
हरित लवादाकडून न्यायालयात धाव : कृष्णाकाठावर असणाऱ्या साखर कारखान्यांकडून पावसाच्या पाण्याने पातळी वाढल्याचा फायदा उठवत नदीपात्रातील रासायनिकयुक्त पाणी सोडल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्षाकडून करीत प्रदूषण मंडळला संबंधितांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र, याबाबत कारवाई होत नसल्याने, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित लवाद न्यायालयात धाव घेतली आहे.
कृष्णा कारखान्या विरोधात याचिका : मासे मृत्यूप्रकरणी महाराष्ट्र सरकार, प्रदूषण महामंडळ आणि कराडच्या कृष्णा कारखान्यात विरोधात याचिका दाखल केलेली आहे. तसेच, या मासे मृत्यूप्रकरणी लवादाकडून समिती गठीत करण्यात यावी आणि त्याच्या चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आल्याचे सुनील फराटे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Rahul Gandhi Detained : राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात