ETV Bharat / state

लोकांनी कोरोनाला घाबरलेच पाहिजे - जयंत पाटील - कोरोना विषाणूला घाबरा

नागरिकांना प्रशासनाकडून कोरोना विषाणूबाबत ज्या खबरदाऱ्या घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्या सर्व सूचना लोकांनी पाळल्या तर आपण कोरोनाला रोखू शकतो, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

minister Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : Mar 18, 2020, 7:48 PM IST

सांगली - लोकांनी कोरोनाला घाबरलेच पाहिजे. कोरोनापेक्षा आपण मोठे आहोत; हे दाखवण्याचे धाडस जनतेने करू नये, अशा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला. सांगली येथे जिल्ह्यातील कोरोना संबंधित परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते. सांगली जिल्ह्यात सध्या कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, सर्व लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. प्रशासन देखील खबरदारी घेत आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे

बुधवारी जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात परदेशातून १९१ प्रवासी परतले आहेत. त्यापैकी ११ जणांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार झाले आहेत. त्या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. मात्र, सर्व १९१ प्रवाशांचे होम क्वॉरंटाईन सुरू असून त्याबाबत प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. मात्र, नागरिकांनी देखील योग्य ती काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

हेही वाचा... 'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा

होय... नागरिकांनी कोरोनाला घाबरलेच पाहिजे - पाटील

कोरोनाबाबत नागरिकांच्या मनामध्ये असलेल्या भीतीबाबत बोलताना पाटील यांनी, कोरोनाची भीती असण्याचे समर्थन केले. 'कोरोनाची भीती ही असलीच पाहिजे. लोकांनी घाबरलेच पाहिजे. याचे कारण आपण कोरोनापेक्षा मोठे असल्याचे धाडस कोणी दाखवू नये' अशी पुष्टी त्यांनी आपल्या वक्तव्याला जोडली. तसेच नागरिकांना ज्या खबरदाऱ्या घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, त्या सर्व सूचना पाळल्या तरच आपण कोरोनाला रोखू शकतो' असे मतही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

'परदेशी प्रवाशांचे होम क्वॉरंटाईन परिणामकारकपणे राबवा. जे प्रवासी होम क्वॉरंटाईन पाळण्यात कसूर करतील, त्यांना सक्तीने विलगीकरण कक्षात पाठवा. त्याचबरोबर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा' असे निर्देश यावेळी जयंत पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते कोरोना जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. या चित्ररथाद्वारे कोरोनाबाबत संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.