सांगली - शहरातील शामराव नगर येथील विस्तारीत भागात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पाण्यात बसून जलआंदोलन केले. तसेच साचलेल्या घाण पाण्यातून अधिकाऱ्यांना फिरवत पालिका प्रशासनाचा निषेध केला.
हे वाचलं का? - कोल्हापुरात 7 दरवाजे तोडून सराफ दुकान फोडले; चोर सीसीटीव्हीत कैद
पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांना या भागातील साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करावा, अशी मागणी वारंवार पालिकेकडे केली. मात्र, पालिकेने याकडे दुर्लक्ष होत केले. त्यामुळे आज मंगळवारी संतप्त नागरिकांना पालिकेच्या निषेधार्थ अस्वच्छ पाण्यात बसून आंदोलने केले. हे जल आंदोलन करत पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अस्वच्छ पाण्याचा तातडीने निचरा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत अस्वच्छ पाण्यातून चालायला लावले. तसेच मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.