सांगली - कुणावर किती प्रेम असेल, तसं सांगणं अवघड आहे. कारण सांगलीच्या एका गाय प्रेमीने आपल्या गाईचे चक्क डोहाळे जेवण घातले. हे डोहाळे जेवण काही साधं-सुधा नव्हतं. तर अगदी झकास होते. गाईला सजवण्यापासून मेजवानीसाठी पंचपक्वान्नांचा रेलचेल, आहेर-माहेर असे सर्व काही करण्यात आले. हा सोहळा अगदी एखाद्या सुवासनेच्या ओटीभरणीपेक्षाही दिमाखदार होता.
हौसेला मोल नसतं! थाटात पार पडला गायीच्या डोहाळे जेवणाचा जंगी कार्यक्रम असा ही ओटी भरण सोहळा -गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आता ही प्रथा प्राण्यांच्या बाबतीतही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण सांगलीच्या आष्टा येथील पार पडलेले, एका गायीचे डोहाळे जेवण सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. कारण एखाद्या सुवासिनीचा डोहाळे जेवणाला लाजवेल अशा थाटात गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.सांगलीच्या आष्टा येथील सागर सिद्ध यांच्या गायीचा पार पडलेला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे. सागर सिद्ध कुटुंबाचे त्यांच्याकडे असणाऱ्यांनी गाई-बैलांवर जीवापाड प्रेम आहे. सागर सिद्ध यांचे त्यांच्या वडिलांनी आणलेल्या पाडीवर खूप प्रेम. अगदी तिचा आंघोळपासून सर्व गोष्टींचा काळजी सागर स्वतः घेतात. गाईवर नितांत प्रेम असणाऱ्या सागर यांच्या गाईला सध्या दिवस गेले असून सातवा महिना सुरू आहे. महिलांची जशी ओटी भरणी होते. त्यापद्धतीने सागर सिद्ध आणि त्यांच्या कुटुंबांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा बेत आखला. त्यासाठी "शिवार,भरण ओटी"असे कार्यक्रमाचे नाव देऊन मित्र परिवार व आप्तेष्टांना निमंत्रण धाडले.
पंचपक्वान्न आणि आहेर-माहेर...अगदी त्यांनी आपल्या गाईला या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमा निमित्ताने छान सजवले. शिंग्या शेंब्या ,पासूनपाया पर्यंत फुलांच्यापासून तिच्या अंगावर मखमली झुला,साडया,कंकण अशा पद्धतीचे वेशभूषा करण्यात आली.तसेच पुरी-बासुंदी,खाजा,जिलेबी,लाडू,तळलेल्या पदार्थ,फळे अशी पंचपकपानाची मांदियाळी तयार करण्यात आली. इतकंच नव्हे तर डोहाळे जेवण्याच्या निमित्ताने कार्यक्रमाला हजर असलेल्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना आहेर- माहेर सोबत गायीच्या प्रतिमेचा फोटो देण्याचा कार्यक्रम हे या ठिकाणी पार पडला. गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले. खर तर असं म्हणतात की हौसेला मोल नसतं. आणि सागर सिद्ध व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या गायीच्या डोहाळे जेवणाच्या निमित्ताने केलेला कार्यक्रम त्याचे उदाहरण म्हणावे लागेल.
हेही वाचा - ठाकरे पॅटर्न विसरून शिवसेनेची गांधी पॅटर्नकडे वाटचाल - देवेंद्र फडणवीस