ETV Bharat / state

कोरोनामुळे 'नागवेली' धोक्यात, दरात 80 टक्क्यांची घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत पान टपऱ्या बंद होत्या. आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात पान टपऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र, विड्याच्या पानांची मागणी घटल्याने पान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

author img

By

Published : Sep 12, 2020, 4:41 PM IST

Updated : Sep 12, 2020, 4:48 PM IST

पान काढताना शेतकरी
पान काढताना शेतकरी

सांगली - जिल्ह्यातील पान शेती सध्या धोक्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी झालेल्या टाळेबंदीमुळे पानांची मागणी घटली आहे. यामुळे पानउत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहेत. देशाच्या कानो-कोपऱ्यात जाणाऱ्या या पानांची मागणी कमी झाल्याने दर कोसळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 80 टक्क्यांची दरात घसरण झाली आहे.

कोरोनामुळे 'नागवेली' धोक्यात

सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग हा पानमळ्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हा भाग पानमळ्याचा आगार मानला जातो. कळी, फाफडा, हक्कल या तीन प्रकारच्या पानांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र, कोरोना आणि टाळेबंदीमुळे येथील पानमळ्याच्या शेतीवर देखील मोठा परिणाम झाला आहे.

मोठ्या प्रमाणात पान टपरीमध्ये खायच्या पानांचा वापर होतो. त्याचबरोबर किरकोळ प्रमाणात धार्मिक विधीसाठी वापरला जातो. मात्र, टाळेबंदीमध्ये सर्व पान पट्ट्या, बाजारपेठा बंद होत्या. सध्या पान पट्ट्या सुरू झाल्या आहेत. पण, नागवेलीच्या पानांची मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी व्यापाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पानांच्या दरात यंदा 80 टक्क्यांनी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार ते तेराशे रुपयांनी एक डाग कमी झाले आहेत. एका डाग म्हणजेच तीन हजार पाने. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मिरज तालुक्यातील मालगाव, बेडग, आरग, नरवाड, भोसे, म्हैसाळ या गावांनी पान मळ्यासाठी स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुंबई, नाशिक, चांदवड, रामपूर, कोकण या भागासह देशाच्या काना-कोपऱ्यात सांगलीतील पानांची विक्री मोठ्या प्रमाणात होते.

आर्थिक घडी विस्कटली

गतवर्षी आठ दिवसाला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न पान उत्पादक शेतकऱ्यांना मिळत होते. पण, यंदा दर्जेदार पाने तयार झाली असून देखील मागणी नसल्याने वेलीवरच पाने खुडाविना तशीच पडून आहेत. मागणी अभावी आठ दिवसांतून एकदा खुडा करावा लागत असून आता आठवड्याला केवळ 25 हजार रुपयांचेच उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. यामुळे पानउत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा - जन्म आणि मृत्यू एकत्रच... जुळ्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Last Updated : Sep 12, 2020, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.