ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत जतचा एकजण ठार

जत तालुक्यातील बिळुर रोडवर अपघात झाला. यामध्ये मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला आहे.

बिळुर रोडवर अपघात
बिळुर रोडवर अपघात
author img

By

Published : Dec 3, 2020, 5:35 PM IST

सांगली - जत तालुक्यातील बिळुर रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल स्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीशैल बाळापा चिंतामणी (वय 60 वर्षे रा.वज्रवाड ता.जत) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बिळुर रोडवर अपघात

पोलिसात गुन्हा दाखल-

ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनाधारका विरोधात रात्री उशीरा जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीशैल चिंतामणी हे वज्रवाड वरून जत कडे येत होते. दरम्यान आशीर्वाद गार्डन पासून जतकडेच्या अर्धा किलोमीटर अंतरावर मोटरसायकल सवार अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यात श्रीशैल चिंतामणी यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा जागेवर मृत्यू झाला.

घटनास्थळावरून काही नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला कळवले. रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी चिंतामणी यांना तपासले तर ते मृत झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

हेही वाचा- "मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, असे कोणाला वाटत असेल तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.