ETV Bharat / state

सांगलीत दुधेभावीच्या 'त्या' कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण - सांगली कोरोना न्यूज

कुपवाडच्या वाघमोडे नगर परिसरात राहणारी ही मुलगी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मेहुणीची मुलगी असून ती बाधीत पती -पत्नीच्या जवळच्या संपर्कात आली होती.

one-more-tested-corona-positive-in-sangali
सांगलीत दुधेभावीच्या 'त्या' कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी एकाला कोरोनाची लागण
author img

By

Published : May 2, 2020, 11:01 AM IST

सांगली - कुपवाड येथील एका १७ वर्षीय मुलीला कोरोना लागण झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीतील कोरोनाबाधित पती-पत्नीच्या संपर्कात ही मुलगी आली होती. या नवीन रुग्णासह सांगलीत एकूण बाधितांची संख्या ६वर पोहचली आहे.

कवठेमहांकाळच्या दुधेभावीतील कोरोनाबाधित पती-पत्नीच्या संपर्कात आलेल्या एका 17 वर्षीय मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कुपवाडच्या वाघमोडे नगर परिसरात राहणारी ही मुलगी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मेहुणीची मुलगी असून ती बाधीत पती -पत्नीच्या जवळच्या संपर्कात आली होती. शुक्रवारी त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दुधेभावी, कुपवाडा येथील २८ जणांच्या स्वॅबमधील २६ जणांचे अहवाल आले होते. त्यामध्ये बाधित व्यक्तीच्या पत्नीला लागण झाल्याचे समोर आले होते. तर २५ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले होते. तर दोन अहवाल प्रलंबित होते.

आज सकाळी प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले असून त्यात दुसऱ्या मुलाचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. मात्र त्या बाधिताच्या मेहुणीच्या मुलीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर तिला मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तर शुक्रवारपर्यंत ५ असणारी सांगलीची कोरोना रुग्ण संख्या आता ६ वर पोहचली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.