ETV Bharat / state

सांगलीकरांची चिंता वाढली; कामेरीच्या एकाला कोरोनाची लागण, एकूण रुग्ण संख्या ३ वर..

सांगलीच्या कामेरीमध्ये एकाला कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. कराडमध्ये कोरोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णाचे ते नातेवाईक आहेत.

One more corona positive case found in sangli
सांगलीकरांची चिंता वाढली; कामेरीच्या एकाला कोरोनाची लागण
author img

By

Published : Apr 28, 2020, 5:23 PM IST

सांगली - जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. सांगलीच्या कामेरीमध्ये एकाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. कराडमध्ये कोरोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णाचे ते नातेवाईक आहेत. त्यामुळे सांगलीतील कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या ३ वर पोहोचल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.

डॉ.संजय साळुंखे - नोडल अधिकारी , कोरोना

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव आणि कामेरी येथील दोघांना कोरोना लागण झाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये असणारे हे दोघे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, हे दोघे सांगली जिल्ह्यातील असून हे दोघे रोज एकाच गाडीवरून ये-जा करत होते. या पार्श्वभूमीवर सांगली प्रशसानाकडून कामेरी आणि कासेगावमध्ये मोठी खबरदारीच्या उपयोजना राबवण्यात आल्या होत्या. त्या दोघा कोरोनाबाधितांच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले होते. तर यातील २७ जणांचे स्वॅब टेस्टसाठी घेण्यात आले होते. यापैकी २६ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत, तर १ चा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. ९४ वर्षीय ही व्यक्ती असून त्यांना कोरोना लागन झाली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या कामेरीमधील कोरोनाग्रस्ताचे 'ते'नातेवाईक असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.

सांगलीकरांची चिंता वाढली; कामेरीच्या एकाला कोरोनाची लागण

शिराळा तालुक्यातील निगडी येथील दोघा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या २४ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर कडेगावमधील येतगाव येथील चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉ.संजय साळुंखे यांनी दिली आहे. तसेच कडेगावच्या खेराडे वांगी येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याला कोरोना झाल्याची माहिती मुंबईच्या सायन रुग्णालयाने दिली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, सदर व्यक्तीचे नाव चुकून आल्याचे नंतर सायना रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. याबाबत जिल्हा प्रशासानाकडून सायना रुग्णालयाला याबाबत लेखी अहवाल मागवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.