सांगली: शहरातील पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावरून उडी घेतल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. पिटर दास फिलिप, वय 40, राहणार-घोरपडी,पुणे असे मृताचे नाव आहे. अति मद्यपानाच्या त्रासामुळे तो शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता .मात्र,अति दक्षता विभागातून पळून जाताना हा प्रकार घडला आहे.
17 नोव्हेंबर रोजी पीटर याला 108 रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये अति मद्यपाणामुळे दाखल करण्यात आले होता. आणि त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. याबाबतची माहिती पीटर याच्या नातेवाईकांना देण्यात आली होती. दरम्यान शनिवारी सकाळच्या सुमारास पीटर हा शुद्धीत आला. त्यानंतर त्याने रुग्णालयातून धूम ठोकली. पण सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला सांगलीच्या बस स्थानकावरून पकडून पुन्हा रुग्णालयात आणला होता.
रुग्णालयात दाखल केला होते. मात्र, पीटर हा पुन्हा अतिदक्षता विभागातून पळाला आणि तो थेट इमारतीच्या छतावर पोहोचला. यावेळी सुरक्षारक्षक आणि कर्मचारी हे मागे लागल्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने इमारतीच्या छातावरून उडी घेतली. ज्यामध्ये पीटर हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सायंकाळच्या सुमारास उपचार सुरू असताना पीटरचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.