ETV Bharat / state

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील न झाल्याने दोघांना बेदम मारहाण; 14 जणांविरोधात गुन्हा दाखल - व्हॉट्सअप ग्रुपवरून भांडण

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार विटा येथे समोर आला आहे. याप्रकरणी 14 जणांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार
author img

By

Published : Nov 21, 2019, 11:18 AM IST

सांगली - व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार विटा येथे समोर आला आहे. याप्रकरणी 14 जणांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रविण साठे या व्यक्तीने 'राजे' नावाचा व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये प्रविणने त्याचा मित्र आकाश भस्मे सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र, आकाशने ग्रुपमध्ये सामील होण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून प्रविण साठे व त्याच्या मित्रांनी आकाशला 15 नोव्हेंबरला रस्त्यात अडवून शिवीगाळ करून मारहाण केली.

यानंतर आकाशने त्याच्या वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर वडील संतोष भस्मे यांनी पोलीस ठाण्यात प्रविण साठेसह त्याच्या 14 मित्रांविरोधात तक्रार दिली.

गुन्हा नोंदवल्यानंतर घरी परतणाऱ्या आकाशला संबंधितांनी पुन्हा गाठून बेदम मारहाण केली. आम्ही देखील तुझ्याविरोधात अॅट्रॉसिटीचा खटला दाखल करून तुझे करिअर खराब करू, अशी धमकी दिल्याची फिर्याद संतोष भस्मे यांनी दिली आहे.

Intro:File name - mh_sng_02_whatsaap_issue_vis_01_7203751 -

स्लग - व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील न झाल्याने दोघांना मारहाण,१४ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल...

अँकर - व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील होण्यास नकार दिल्याने दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सांगलीच्या विटा येथे हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी 14 जणांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.Body:सोशल मीडियावरील व्हाटसएपच्या कमेंटवरून अनेक वाद -विवाद,मारामारी प्रकार घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात.आणि सांगलीच्या विटा येथे याचा व्हाटसपवरून हाणामारीचा प्रकार घडला आहे.
व्हाटसएप ग्रुप मध्ये सामील होत,नसल्याने दोघा मित्रांना त्याच्याच मित्रांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.विटा येथील प्रवीण साठे याने राजे नावाचा व्हाट्सअप ग्रुप सुरू केला.या ग्रुप मध्ये प्रवीण याने त्याचा मित्र आकाश भस्मे व त्याच्या मित्राला शामिल होण्यास सांगितले होते.मात्र आकाश याने ग्रुप मध्ये सामील होण्यास नकार दिला.याचा राग मनात धरून प्रवीण साठे याने व त्याच्या मित्रांनी
आकाश याला 15 नोव्हेंबर रोजी घरी जात असताना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली.त्यांनतर आकाश याने याबाबत वडिलांना सर्व हकीकत सांगितली असता वडील संतोष भस्मे यांनी याबाबत विटा पोलीस ठाण्यात प्रवीण साठेसह त्याच्या 14 मित्रांवर धमकी देऊन मारहाण केल्याची तक्रार दिली.यानंतर घरी परतणाऱ्या आकाश याला पुन्हा गाठत तुझी मस्ती गेली नाही असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली व इथून पुढे रोज तुझ्याबरोबर असरच होणार,आमच्याविरोधात तक्रार दिली आहेस, आता आम्ही देखील तुमच्यावर ऍट्रोसिटीची केस टाकून तुझे करिअर खराब करू,अशी धमकी दिल्याची फिर्याद आकाशचे वडील संतोष भस्मे यांनी विटा पोलिसां मध्ये दिली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.