सांगली ( जत ) : याबाबत अधिक माहिती अशी, बालगाव येथील बसवेश्वर चौकात प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज कार्यक्रम गुरुवारी सकाळी नऊ वाजता सुमारास सुरू होता. सदरच्या ठिकाणचा राष्ट्रध्वज हा वरती केसरी रंगाच्या ऐवजी हिरवा रंग अशी बांधणी शिक्षक प्रभाकर सलगर यांनी केली होती. याबाबत सलगर यांना माहिती असणे गरजेचे होते. दरम्यान, सदर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी राहणार बालगाव हे पुढे गेले.
राष्ट्रध्वज उलटा फडकला : त्यावेळी राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परीषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर हे पुढे आले. त्यांनी दुंडाप्पा कोटी यांनी झेंडा फडकविण्याची दोरी हातात दिली व दुसरी दोरी त्यांच्या हातात धरून उभारले त्यांनंतर राष्ट्रध्वज सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रध्वजाचा केसरी रंग हा वर असणे गरजेचे असताना तो खाली व हिरवा रंग वर अशा स्थितीत सदरचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाची अवहेलना झाली आहे.
राष्ट्रध्वजाच्या अपमान : तरी सदरचा राष्ट्रध्वज बांधणारे जिल्हा परीषद शिक्षक प्रभाकर इरगोंडा सलगर हे जिल्हा परीषद शिक्षक असुन त्यांनी राष्ट्रध्वज फडकविण्या विषयीचे ज्ञान असताना देखील त्यांनी सदरचा राष्ट्रध्वज हा भगवा रंग वर पाहीजे असताना खाली करून वर हिरवा रंग असा बाधून तो गावातील दुंडाप्पा शेकाप्पा कोटी यांचे हस्ते फडकविणेत आला आहे. राष्ट्रध्वजाच्या अपमान झाल्याने सलगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन : गुरूवारी राजपथावर मोठ्या उत्साहात महाराष्ट्राच्या चित्ररथाचं संचलन पार पडले. यावर्षी साडेतीन शक्तिपीठ आणि नारी शक्तिवर आधारीत असा देखावा चित्ररथात करण्यात आला होता. देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली, मुंबईतील इमारतींना तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.
विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न : उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ध्वजारोहण झाले. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर ध्वज वंदन होणार झाले. या कार्यक्रमात सर्वच विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गुरूवारी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण पार पडले. संघाचे नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले.