ETV Bharat / state

On Occasion of Nagpanchami Festival : जिवंत नागांची पूजा करणाऱ्या बत्तीस शिराळा गावाची गाथा - Battis Shirala Village in Sangli

श्रावण महिना सुरू ( Month of Shravan ) झाला की, मराठी माणसांचे सर्व सण सुरू ( Festivals Begin in Shravan ) होतात. त्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी होय. महाराष्ट्रातील सांगली येथील बत्तीस शिराळा ( Battis Shirala Village in Sangli ) हे गाव जिवंत नागाच्या पूजेसाठी ( Worshiping Living Snakes ) ओळखले जाते. न्यायालयाच्या निर्बंधानंतर या ठिकाणी जिवंत नागांच्या ऐवजी प्रतीकात्मक नागांची पूजा केली जाते. मात्र, गावात साप दिसला तर त्याला न मारता नमस्कार घातला जातो. या गावात शेकडो वर्षांपूर्वी जिवंत नागांच्या पूजेला सुरुवात झाली. परंतु, आता न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपंचमी साजरी करावी लागत आहे.

Nagpanchami Festival
नागपंचमी
author img

By

Published : Aug 2, 2022, 7:04 AM IST

Updated : Aug 2, 2022, 9:30 AM IST

सांगली : श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे । क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।। या कविता ऐकून आपण मोठे झालो. श्रावणात ( Month of Shravan ) सर्व सणांची सुरुवात नागपंचमीपासून होते. महाराष्ट्रातील सांगली येथील बत्तीस शिराळा ( Battis Shirala Village in Sangli ) हे गाव जिवंत नागांच्या पूजेसाठी ( Worshiping Living Snakes ) नेहमीच ओळखले जाते. न्यायालयाच्या निर्बंधानंतर या ठिकाणी जिवंत नागांच्या ऐवजी प्रतीकात्मक नागांची पूजा केली जाते. मात्र, गावात साप दिसला तर त्याला न मारता नमस्कार घातला जातो. या गावात शेकडो वर्षांपूर्वी जिवंत नागांच्या पूजेला सुरुवात झाली. याबाबत आख्यायिकादेखील आहे. पण, आज न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपंचमी साजरी करावी लागत असल्याने, पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्याची परवानगीची मागणी प्रत्येक शिराळकर करतो.

Nagpanchami Festival Battis Shirala Village

नागाचे गाव म्हणून शिराळ्याची जगभर प्रसिद्धी : महाराष्ट्रात नव्हे तर देशात सांगलीच्या 32 शिराळ्याची एक वेगळी ओळख आहे. नागांचे गाव म्हणून शिराळ्याची प्रसिद्धी जगभर आहे. शिराळा गावामध्ये नागाला नेहमीच पूज्य मानले जाते. गावातील प्रत्येक घरात नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा होते. आता ती प्रतीकात्मक स्वरूपात होते. मात्र, या गावात जिवंत नागांची पूजा करण्याची एक प्रथा होती. घरोघरी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जात असे. त्यामुळे शिराळा नगरीत नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागराजाचे वास्तव्य असायचे. प्रत्येक महिला नागराजाला भाऊ मानून, त्याच्यासाठी उपवास करते आणि नागपूजेनंतर उपवास सोडतात.

Battis Shirala
बत्तीस शिराळा गाव

शिराळा गावाचा ऐतिहासिक वारसा : शिराळ गावात नागपंचमीच्या दिवशी होणाऱ्या जिवंत नावाच्या पूजेमुळे शिराळा हे जग प्रसिद्ध आहे. पण, या जिवंत नागांच्या पूजेलादेखील ऐतिहासिक वारसा आहे. शिराळा गावात आलेल्या गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या चमत्कारातून नाग प्रकट केला. त्यानंतर घरोघरी नागांची पूजा होऊ लागली. गावातील महाजन कुटुंबाच्या दारामध्ये गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागणीसाठी पोहोचले होते. तो दिवस नागपंचमीचा होता. दारात पोहचलेल्या गोरक्षनाथ महाराजांनी दीक्षा मागण्यासाठी अनेक वेळा हाक दिली. मात्र, आतून कोणीच लवकर आले नाही.

नवनाथांपैकी गोरक्षनाथांनी आपल्या दैवीशक्तीने केला चमत्कार : काही वेळाने घरातील महिला आल्या. त्यावेळी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना एवढा उशीर का लागला, याची विचारणा केली. त्यावेळी महिलांनी मातीच्या नागांची पूजा करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी त्याच ठिकाणी आपल्या दैवशक्तीतून जिवंत नाग प्रगट केला. आणि जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर शिराळा नगरीत घरोघरी जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे. नागपंचमीच्या दिवशी गावातून जिवंत नागांची मिरवणूकसुद्धा काढण्याची प्रथा त्यानंतर सुरू झाली. शिराळा नगरीतील नागपंचमी पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातून भाविकसुद्धा मोठ्या संख्येने दाखल होत असत. शेकडो वर्षे ही परंपरा जोपासली गेली.

जिवंत नागाच्या पूजेची शिराळकर ग्रामस्थांची मागणी : मात्र 2006 साली प्राणिमित्र व इतर सामाजिक संघटनांनी जिवंत नागांच्या पूजेवर बंदी आणण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर वन्यप्राणी कायद्यानुसार न्यायालयाने जिवंत नागांच्या पूजेवर निर्बंध घातले. त्यानंतर शिराळा नगरीमध्ये जिवंत नागांच्या पूजेची परंपरा खंडित झाली. आजसुद्धा शिराळकर जिवंत नागांचे पूजा करण्याच्या परवानगीची मागणी वारंवार करीत आहेत. सध्या नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांच्याऐवजी प्रतीकात्मक नागांची पूजा करून शिराळकर साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करतात.

हेही वाचा : CM Meet Mohan Bhagwat : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सरसंघचालकांची भेट; काय झाली चर्चा?

Last Updated : Aug 2, 2022, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.