ETV Bharat / state

एकही पूरग्रस्त नागरिक सरकारला दोष देत नाही; महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

एकही पूरग्रस्त नागरिक सरकारला दोष देत नाही, असा दावा महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील केला आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सूचना कराव्यात, असा टोला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लगावला आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला
author img

By

Published : Aug 22, 2019, 11:38 PM IST

सांगली - एकही पूरग्रस्त नागरिक सरकारला दोष देत नाही, असा दावा महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील केला आहे. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सूचना कराव्यात, असा टोला त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना लगावला आहे. तसेच, पूरग्रस्तांना सर्व पातळीवर सरकारची मदत पोहचत असल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. ते आज सांगलीमध्ये बोलत होते. सांगलीत पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महापुराला केंद्र आणि राज्य सरकारचा असमन्वय जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना, आपण दोन्ही जिल्ह्यात सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहोत. तिथे एकही पूरग्रस्त सरकारला दोष देत नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत, पंचनामे आणि नुकसान या सर्व बाबींचा आढावा पाटील यांनी घेतला. सानुग्रह अनुदान वाटप, ज्यांची घरे पडली त्यांना एका वर्षाचे घरभाडे, गाव आणि शहर पातळीवर पूरग्रस्तांचे पुनर्वसन याबाबतच्या सूचनादेखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना चार महिने धान्य पुरवण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर, पूरग्रस्त भागातील कामांचा आढावा आणि निर्णय घेण्यासाठी दर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महापुरात ज्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना जीएसटी आणि इतर करांमध्ये सवलत आणि बँकांच्या हप्त्यांमध्ये एक वर्ष सूट मिळावी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली आहे. तर, छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्रीय पातळीवरून याचा लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Intro:
सरफराज सनदी

File Name mh_sng_03_c_patil_on_pur_vis_01_7203751 - mh_sng_03_c_patil_on_pur_byt_02_7203751

स्लग - महापुराबाबत एकही जनता सरकारला दोष देत नाही,महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला .

अँकर - महापुराबाबत एकही जनता सरकारला दोष देत नाही,असा दावा महसूल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करत विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सूचना कराव्यात असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना लगावला आहे.तसेच पूरग्रस्तांना सर्व पातळीवर सरकारची मदत पोहचत असल्याचं विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सांगली मध्ये बोलत होते.Body:सांगली जिल्ह्यातल्या पूर परिस्थिती ती आढावा आज राज्याचे
महसुल व मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पूरग्रस्तांना देण्यात येणारी मदत,करण्यात येणारे पंचनामे आणि नुकसान या सर्वच बाबींचा मंत्री पाटील यांनी यावेळी आढावा घेतला. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तीन महिने धान्य पुरवण्याची घोषणाकरण्यात आली होती.आणि आता ती एक महिन्याने वाढविण्यात आली असून चार महिन्यांपर्यंत पूरग्रस्तांना आता धान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतीचे आणि पडलेल्या घरांचे पंचनामे जवळपास पूर्ण होत आलेले आहेत, थोड्याफार प्रमाणात पंचनामे शिल्लक आहेत.तसेच सानुग्रह अनुदान वाटप युद्धपातळीवर सुरू असून गरज पडल्यास आणखी कर्मचारी संख्या वाढून हे अनुदान संपवण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पूरग्रस्तांची घरं पडलेली आहेत,त्यांना एक वर्षासाठीच भाडे लवकरच देण्यात येईल येईल,त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मोठा आहे, आणि तोही गाव पातळीवर आणि शहर पातळीवर सोडवला जाईल, त्याचबरोबर पुराच्या बाबतीत आढावा आणि आणखी काही निर्णय घेण्यासाठी दर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडणार आहे,आणि यामधून अनेक मुद्द्यांवर निर्णय घेतले जातील, असंही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.तसेच छोट्या व्यापाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ज्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे.त्यांना जीएसटी आणि इतर करांच्या मध्ये सवलत आणि त्याचबरोबर बँकांच्या हप्त्यामध्येही
एक वर्ष सूट देण्याच्या बाबतची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून केली आहे.त्यामुळे केंद्रीय पातळीवरून याचाही निर्णय लवकर होईल अशी अपेक्षा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महापुराला केंद्र आणि राज्य सरकारचा समन्वय जबाबदार असल्याचा आरोप केला होता,यावरून बोलताना,आपण दोन्ही जिल्ह्यात सर्व पूर भागात जात आहोत,आणि एकही पूरग्रस्त सरकारला दोष देत नाही,असं स्पष्ट करत विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा सूचना कराव्यात तर पूर्ण केल्या जातील,असा टोला मंत्री पाटील यांनी राजू शेट्टींना लगावला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.