सांगली - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी दिवसभरात तब्बल ९९ कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ६७ जणांचा समावेश आहे.उपचार घेणाऱ्या ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आणि ४८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ७९० अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून बाधितांची एकूण संख्या १,६४३ झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी उपचार घेणाऱ्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मिरज शहरातील १ ,कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव १ आणि कवठेमहांकाळ शहरातील १ असे तिघांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९९ रुग्णांची भर पडली आहे.ज्यामध्ये ग्रामीण भागापेक्षा सांगली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या अधिक आहे. वाढलेल्या रुगणांमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल ६७ जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये सांगली शहरातील ४१ आणि मिरज शहरातील २६ जणांचा समावेश आहे.
४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. कोरोना उपचार घेणारे ३६ जण हे अतिदक्षता
विभागात असून यामधील २० जण हे ऑक्सिजनवर तर १५ जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर तर १ जण इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १,६४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आतापर्यंत ८०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात वाढललेले कोरोना रुग्ण
आटपाडी तालुका- आटपाडी १,आवळाई १
कडेगाव तालुका- बोबलवाडी १
कवठेमहांकाळ तालुका- बोरगांव १, विठठलवाडी १,शिंदेवाडी १
खानापूर तालुका- विटा २, माधळमुठी ३
मिरज तालुका- माधवनगर १,मौजे डिग्रज १, काकडवाडी १, तुंग १, समडोळी २, मालगांव १, कसबेडिग्रज २, सुभाषनगर १,बेडग १
पलुस तालुका- कुंडल १,दुधोंडी १
शिराळा तालुका- मंगरुळ १, नाठवडे १, गवळेवाडी २
तासगाव तालुका- तासगांव १, चिंचणी १, भैरववाडी १
वाळवा तालुका- रोजावाडी १