ETV Bharat / state

सांगलीत तिघांची कोरोनावर मात, तर चार कोरोनाबाधितांची नोंद - सांगली कोरोना पेशंट

सांगली जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी दुपारी आणखी चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईहून आलेल्या दोघांचा आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांचा समावेश आहे.

sangali corona update
सांगलीत तिघांची कोरोनावर मात, तर चार कोरोनाबाधितांची नोंद
author img

By

Published : Jun 4, 2020, 5:11 PM IST

सांगली - जिल्ह्यात आणखी चार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेल्या आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आहेत. यामध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२८ झाली आहे. जिल्ह्यात ५१ सक्रिय्र रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर गुरुवारी तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी दुपारी आणखी चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईहून आलेल्या दोघांचा आणि कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांचा समावेश आहे.

हे रुग्ण आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील आहेत. यामध्ये आटपाडीच्या शेटफळे येथील एका कोरोनाबाधिताच्या घरातील दोन मुलांना लागण झाली आहे. तर खानापूर तालुक्यातल्या झरे येथील एक पॉझिटिव रुग्णाच्या घरातील पाच वर्षांच्या मुलाला लागण झाली आहे. तसेच खानापूर तालुक्यात साळशिंगे येथील मुंबईहून आलेल्या एका ६० वर्षीय पुरुषाला कोरोना लागण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ही ५१ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १२८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आजअखेर ७३ रुग्ण बरे झाले आहेत.

गुरुवारी ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ७० वर्षाय वृद्ध, वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील ३७ वर्षांची व्यक्ती आणि आटपाडीच्या खरसुंडी नजीकच्या कामत येतील ६५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये रवाना करण्यात आले आहे.

आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.