सांगली - केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्टा ते इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅकटर मोर्चात शेतकरी शेकडो ट्रॅकटरसह सहभागी झाले होते.
केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचा युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा, जयंत पाटलांच्या पुत्राचे नेतृत्व - केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचा युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीकडून कृषी कायदे रद्द व इंधन दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्टा ते इस्लामपूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य ट्रॅक्टर रॅली निघाली.
केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीचा युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा
सांगली - केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्टा ते इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ट्रॅकटर मोर्चात शेतकरी शेकडो ट्रॅकटरसह सहभागी झाले होते.
देशभर केंद्र सरकारच्या विरोधात कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. सांगलीत केंद्रातील भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीकडून कृषी कायदे रद्द व इंधन दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी युवा किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. आष्टा ते इस्लामपूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य ट्रॅक्टर रॅली निघाली. यामध्ये शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आष्टा येथून या ट्रॅक्टर मोर्चास सुरुवात झाली आणि इस्लामपूर तहसील कार्यालयावर हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला.
यावेळी प्रतीक पाटील म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे जे आंदोलन चालू आहे त्याबाबत विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि शेतकरी जर हा कायदा रद्द करण्याची मागणी करत असतील तर तो रद्द केला पाहिजे. त्याचबरोबर केंद्राच्या वतीने आज जी इंधन दरवाढ केलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य भरडला जात आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये केंद्राने सामन्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पेट्रोल व डिझेल दरवाढ कमी केली पाहिजे, अशी मागणीही प्रतीक पाटील यांनी यावेळी केली आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 3:20 PM IST