सांगली - मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध लागला तर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत माणसंसुद्धा मिळणार नाहीत, अशी घणाघाती टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच या सरकारची अवस्था आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खातंय, अशी असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी रयत क्रांती संघटना राज्यपालांची भेट घेणार असल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल -
मनसुख हिरेन हत्या आणि परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका करत भाजपकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये बोलताना भाजपचा समाचार घेत, दर महिन्यातून दोन वेळ भाजप राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात. त्यात काय नवीन, असा टोला लगावला होता. यावरून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत राज्याला लुटण्याचे काम - खोत म्हणाले, रोम जळत होतं, त्यावेळी रोमचा राजा बिगुल वाजवत होता. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जनता एका बाजूला सर्व प्रश्नांच्या बाबतीत हैराण झालेली आहे. अशा काळामध्ये या राज्यातील महाविकास आघाडीचे सगळे सरदार राज्याला लुटण्याच्या कामाला लागले आहेत. त्यांना जनतेची कोणतीच काळजी नाही, अशी टीका केली आहे.
..या आधी ओरडून नाही म्हणत होता -
एकंदरीतच सगळे घडलेले प्रकार पाहता ,मी एवढंच म्हणेन की, आत्तापर्यंत मनसुख यांचा खून झाला नाही, असे म्हणत होते. तुम्ही कुठून जावई शोध लावला. आता म्हणायला लागले माजी पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत तपास पोहोचत आहे. तुम्ही सभागृहांमध्ये ओरडून सांगत होता, यामध्ये पोलीस खात्यातील कोणत्याही अधिकाऱ्यांचा हात नाही. पण आता NIA ची चौकशी लागल्याबरोबर तुम्ही म्हणत आहात, माजी पोलीस आयुक्त यांच्यापर्यंत खुनाचे धागेदोरे जात आहेत,मग ATS ने लगेच कसे काय ,दोन-चार लोक पकडले,मला वाटतं हे पूर्वीच्या काळामध्ये दारूच्या हातभट्ट्या पोलीस छापा घातल्यानंतर मालक फंटर देत होता,तसं काही पकडले का मग ? याचाही आता मग खुलासा करावा लागेल.
राष्ट्रवादीला निवडणूकीत माणसं मिळणार नाहीत..
पण यामुळे देशाला खऱ्या अर्थानं शरमेने मान खाली घालावी,अशी बाब या ठिकाणी घडली आहे.तसेच मुंबईची ज्यांच्या हातामध्ये संरक्षण आहे,ते जर बॉम्बस्फोट सारख्या कारवाईमध्ये उतरणार असतील,याच्या मागचे मास्टरमाइंड कोण आहेत,सूत्रधार कोण आहे ? इथपर्यंत सुद्धा तपास जाणे गरजेचे आहे.आणि इथपर्यंत तपास गेला, तर निश्चितपणे लक्षात येईल की, निवडणुकीला उभा राहायला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्य मध्ये माणसं मिळणार नाहीत,असे वाईट परिस्थिती निर्माण होईल.अशी टीका खोत यांनी केली.
हे ही वाचा - निलंबित कारागृह अधीक्षकांचा राष्ट्रपतींकडे इच्छामरणाचा अर्ज
राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपालांची घेणार भेट..
त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रपती राजवट ही आत्तापर्यंत लागलाच पाहिजे होती,ही खरे तर महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे.कारण महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र सुरक्षित नाही,त्यामुळे राज्यात
राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटना लवकरच राज्यपालांची भेट घेणार असल्याचे,आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे.