ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रोगप्रतिकारक औषधांचे मोफत वाटप - सांगली कोरोना घडामोडी

घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाकरिता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अ‌ॅरसेनिक अल्बम -३० औषध मोफत, मास्क तसेच माहितीपत्रक वाटप सुरू करण्यात आले आहे.

सांगली कोरोना
सांगली कोरोना
author img

By

Published : May 29, 2020, 6:42 PM IST

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस, सांगली जिल्ह्याच्यावतीने सांगली महापालिका क्षेत्रात कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक उपायासाठी अ‌ॅरसेनिक अल्बम-३० (ARSENIC ALBUM) हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे औषध मोफत, मास्क तसेच माहितीपत्रक प्रत्येक घरा-घरामध्ये वाटपाच्या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू झाली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरोनाविषयी काळजी घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायाकरिता रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अ‌ॅरसेनिक अल्बम-३० औषध मोफत, मास्क तसेच माहितीपत्रक वाटप सुरू करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील २० प्रभागात प्रत्येक घरात जाऊन औषधे व इतर गोष्टींचे वाटप करण्यात येणार आहे.

शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या उपस्थितीत प्रभाग १ मधून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिका सहायक आयुक्त पराग कोडगुले राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी नगरसेवक आयुब बारगीर, युवक राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार, नगरसेवक शेडजी मोहिते, माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी, मुस्ताक रंगरेज आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.