ETV Bharat / state

महापूर लक्षात घेता सांगलीत विमानतळ झाले पाहिजे - खासदार संभाजीराजे भोसले - खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

सांगलीतील महापूर लक्षात घेता मदतीसाठी सांगली जिल्ह्यात विमानतळ होण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

संभाजीराजे भोसले
author img

By

Published : Aug 20, 2019, 9:34 PM IST

सांगली - येथील महापूर लक्षात घेता मदतीसाठी सांगली जिल्ह्यात विमानतळ होण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. तसेच पाटबंधारे यंत्रणा सक्षम करणे गरजेचे असल्याचेही मत खासदार भोसले यांनी स्पष्ट केले, सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगलीत विमानतळ झाले पाहिजे - खासदार संभाजीराजे भोसले

कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मंगळवारी सांगलीतल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात मदत पोहचण्यामध्ये अडचणीची गोष्ट समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या काळात विमानतळ असल्यामुळे नौदल, लष्कर आणि इतर मदत तत्काळ पोहोचू शकली. मात्र, सांगली जिल्ह्यात विमानतळ नसल्याने या अडचणी आल्या.

त्यामुळे सांगलीत मदतीसाठी विमानतळ नाही, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवल्याचे मत खासदार भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे सांगली जिल्ह्यात विमानतळ किंवा धावपट्टी निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत भोसले यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकार्‍यांना आपण याबाबत सूचना दिल्या असल्याची माहितीही खासदार भोसले यांनी यावेळी दिली आहे.

सांगली आणि कोल्हापूर या २ जिल्ह्यात महापुराची परिस्थिती सारखीच होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक प्राधिकरण निर्माण करून त्याच्या माध्यमातून महापुराच्या बाबतीत काम झाले पाहिजे, असे मत खासदार भोसले यांनी व्यक्त केले. तसेच कोयना धरण याठिकाणी पडणारा पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी या सर्वच गोष्टींच्या बाबतीत पाटबंधारे विभागाला आज सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे या विभागाला अद्यावत यंत्रणा मिळाली पाहिजे, असे म्हणत पाटबंधारे विभाग असक्षम असल्याचे अप्रत्यक्षपणे खासदार भोसले यांनी स्पष्ट केले.

Intro:
File name - mh_sng_05_sambhaji_raje_on_pur_vis_1_7203751 - mh_sng_05_sambhaji_raje_on_pur_byt_3_7203751

स्लग - महापूर लक्षात घेता सांगलीत विमानतळ झाले पाहिजे - खासदार संभाजीराजे भोसले

अँकर - सांगलीतील महापूर लक्षात घेता मदतीसाठी सांगली जिल्ह्यात विमानतळ होण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.तसेच पाटबंधारे यंत्रणा सक्षम करणे गरजेचे असल्याचेही मत खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय,सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.Body:सांगलीतल्या पूर परिस्थितीचा आज कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आढावा घेतला आहे.पूर भागातील नागरिकांशी संभाजी राजे भोसले यांनी संवाद साधला,त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे.मात्र सांगली जिल्ह्यात मदत पोहचण्यामध्ये अडचणीची गोष्ट समोर आली आहे.ती म्हणजे सांगली जिल्ह्यात विमानतळ नसने, कारण कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या काळात विमानतळ असल्यामुळे नौदल,आर्मी आणि इतर मदत तात्काळ पोहोचू शकली,
त्यामुळे सांगलीत मदतीच्या विमानतळ नाही,ही गोष्ट प्रकर्षाने जाणवल्याचे मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यामुळे सांगली जिल्ह्यात विमानतळ किंवा धावपट्टी निर्माण होणे गरजेचं असल्याचे मत व्यक्त करत जिल्हाधिकार्‍यांना याबाबत आपण सूचना दिल्या असल्याची माहिती ती खासदार भोसले यांनी यावेळी दिली आहे आहे त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात महापूर हा सारखाच आहे ,त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक प्राधिकरण निर्माण करून त्याच्या माध्यमातून महापुराच्या बाबतीत काम झाले पाहिजे,असं मत खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. तसेच कोयना धरण ,त्या याठिकाणी पडणारा पाऊस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी या सर्वच गोष्टींच्या बाबतीत पाटबंधारे विभाग आज सक्षम करण्याची गरज असून या विभागाला अद्ययावत यंत्रणा मिळाली पाहिजे असं मत व्यक्त करत पाटबंधारे विभाग असक्षम असल्याचा अप्रत्यक्षपणे खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केलंय.

बाईट - संभाजीराजे भोसले -खासदार.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.