ETV Bharat / state

धक्कादायक! तेरा दिवसाच्या बाळाचा आईने केला खून: कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क - sangali police news

तेरा दिवसाच्या बाळाचा आईने खून केल्याचा प्रकार सांगलीत उघडीस आला. याप्रकरणी नवजात मुलाचा आईवर गुन्हा दाखल झाला आहे.

Mother kills 13-day-old baby
आईने केला 13 दिवसांच्या मुलाचा खून
author img

By

Published : Nov 5, 2020, 8:10 AM IST

सांगली- एका तेरा दिवसाच्या नवजात बालकाचा आईने खून केल्याचा प्रकार घडला आहे. आजाराने त्रस्त झालेल्या बालकाची अवस्था पाहवत नसल्याने आईने बाळाचे जीवन संपवून टाकले. पलूस तालुक्यातील भिलवडीच्या माळवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात ऐश्वर्या माळी या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

13 दिवसांच्या बाळाला टाकले पाण्यात

ऐश्वर्या अमितकुमार माळी यांनी 13 दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता. पण काही दिवसात त्या बाळाला शौचाचा आजार झाला. त्यानंतर माळी कुटुंबियांनी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात बाळाचे ऑपरेशन केले. ऑपरेशन नंतर बाळाचं शौच साफ होण्यासाठी बाळाच्या पोटातून नलिका बाहेर काढण्यात आली होती. त्यामुळे बाळाला वेदना होत होत्या. बाळाला होणारा त्रास बघवत नसल्याने नैराश्यातून ऐश्वर्या माळी यांनी छतावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत बाळाला टाकून त्याचे आयुष्य संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नवजात मुलाच्या आईवर गुन्हा दाखल

घटना उघडकीस आल्यानंतर भिलवडी पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत, ऐश्वर्या माळी यांच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बाळाचा खून केल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तपासानंतर ऐश्वर्या माळी यांनी नैराश्यातून आपल्या मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ऐश्वर्या माळी यांच्या विरोधात स्वतःच्या नवजात मुलाचा खून केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा- देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर

हेही वाचा- आजपासून ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स सुरू होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.