सांगली - जेवण दिले नाही, या रागातून एका मुलाने आपल्या सख्ख्या आईची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आगळगाव येथे हा प्रकार घडला. यामध्ये 70 वर्षीय राजक्का ज्ञानु जाधव यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
जेवण न दिल्याने मुलाने केली आईची हत्या, सांगलीतील धक्कादायक घटना - सांगली पोलीस बातमी
जेवण देण्याच्या वादातून चिडलेल्या दशरथ ज्ञानु जाधव यांनी आई राजक्का यांच्या डोक्यावर वीट आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ज्यामध्ये राजक्का जाधव (वय 70) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर जखमी राजक्का यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना राजक्का जाधव यांचा मृत्यू झाला.
जेवण न दिल्याने मुलाने केली आईची हत्या
सांगली - जेवण दिले नाही, या रागातून एका मुलाने आपल्या सख्ख्या आईची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आगळगाव येथे हा प्रकार घडला. यामध्ये 70 वर्षीय राजक्का ज्ञानु जाधव यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.
Last Updated : May 5, 2022, 10:52 PM IST