सांगली - कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या मायलेकींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कवठेमहांकाळ येथील कुंडलापूरमध्ये घडली आहे. विजयादशमीच्या निमित्ताने घरातील धुणे धुण्यासाठी मायलेकी गेल्या असता पाय घसरून पाण्यात पडल्याने हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा - कमी जागा मिळाल्या तरी राष्ट्रीय समाज पक्ष युती सोबतच राहणार - मंत्री महादेव जानकर
साधना किरण देशमुख (वय ३५) व उत्कर्षा किरण देशमुख अशी मृत मायलेकींची नावे आहेत. विजयादशमीचा सण तोंडावर आला असल्याने साधना देशमुख व उत्कर्षा देशमुख या आपल्या घरातील अंथरूण-पांघरून धुण्यासाठी गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर डोंगरसोनी रस्त्यावरील शेततळ्यामध्ये गेल्या होत्या. त्या कपडे धुत असताना उत्कर्षाही पाय घसरून पाण्यात पडली. मुलगी पडल्याचे पाहून तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
हेही वाचा - विटा गावाजवळ एसटी बस पलटी होऊन 38 विद्यार्थी जखमी
ऐन सणाच्या पूर्वीच ही घटना घडल्याने कुंडलापूर गावावर शोककळा पसरली आहे. अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.